देहली आणि नोएडा येथे विविध मंदिरांमध्ये करण्यात आली सामूहिक प्रार्थना !

हिंदु राष्ट्राचे प्रेरणास्थान आणि सनातन संस्थचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवले जात आहे. देहली आणि नोएडा येथील सामूहिक प्रार्थनेच्या वेळी धर्मप्रेमींसह उपस्थित भाविकांनी सहभाग घेतला.

हिंदु जनजागृती समितीच्या हालोंडी आणि नागाव (जिल्हा कोल्हापूर) येथील प्रवचनांसाठी धर्मप्रेमींचा पुढाकार !

१६ एप्रिल या दिवशी हालोंडी येथे हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी घेतलेल्या प्रवचनासाठी अनेक धर्माभिमानी उपस्थित होते.

gurupournima

सनातन संस्थेकडून देहली आणि पंजाब येथे श्रीरामनवमीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

रामनवमीच्या पावन दिनी देहलीच्या सनातनच्या सौ. प्रोमिला अगरवाल यांच्या निवासस्थानी आणि ९ एप्रिल या दिवशी श्रीरामनामसंकीर्तनाचे आयोजन करण्यात आले.

प्रतिदिन धर्मप्रसार करण्याचा पुणे येथील हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेतील धर्मप्रेमींचा निर्धार !

दोन्ही दिवसांच्या सत्रात राष्ट्र-धर्मावर होणारे आघात, तसेच साधनेचे महत्त्व आणि कृती यांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

सत्सेवेतून पुष्कळ आनंद मिळतो आणि सेवा करतच रहावीशी वाटते ! – शिबिरार्थींचे मनोगत

शिबिरात मार्गदर्शन करतांना धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव म्हणाले, ‘‘योग्य साधना केल्यावर देव कसे साहाय्य करतो आणि आपल्या जीवनात कसे आमूलाग्र पालट होतात, हे प्रत्येकाने साधना सत्संगाच्या माध्यमातून अनुभवले.

फरिदाबाद (हरियाणा) येथे सामूहिक प्रार्थनेचे आयोजन

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियान

श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने देशभरात २२७ ठिकाणी ‘गदापूजन’ !

प्रभु श्रीरामचंद्र यांच्या कृपेने रामराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापनेला बळ मिळावे आणि हिंदूंमध्ये शौर्यजागरण व्हावे, यासाठी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने देशभरात ‘गदापूजन’ करण्यात आले. हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अमरावती येथील १२ मंदिरांत साकडे !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने रामनवमीपासून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.
या अंतर्गत विविध मंदिरांमध्ये हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साकडे घालण्यात आले.

काश्मिरी हिंदूंचे त्यांच्या मातृभूमीत पुनर्वसन कधी होणार ? – सौ. रूपा महाडिक, हिंदु जनजागृती समिती

१९ जानेवारी १९९० या दिवशी काश्मीरमधील धर्मांधांनी काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधून हाकलून दिले. आज या घटनेला ३२ वर्षे पूर्ण झाली.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या सात्त्विक उत्पादने अन् ग्रंथप्रदर्शन यांना भाविकांचा चांगला प्रतिसाद !

श्रीरामनवमीच्या निमित्ताने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथप्रदर्शन यांना भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.