परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

देहली – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्र-जागृती अभियान राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या सामाजिक कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथील न्यू कोंडली फेज-३ मधील शिवशक्ती मंदिराच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यात मंदिरातील भक्त, जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या वेळी सनातनच्या ममता गुप्ता म्हणाल्या, ‘‘एक दिवस मंदिराची स्वच्छता करून न थांबता भगवंताचे मंदिर नेहमीच स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, हीच गुरुदेवांच्या चरणी खरी कृतज्ञता ठरेल.’’ या सत्कार्यासाठी स्थानिक धर्मप्रेमी मधु हरबोला आणि सुमन तिवारी यांनी विशेष साहाय्य केले. मंदिराच्या पुजाऱ्यांनी या अभियानाचे कौतुक केले.
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’