हरिद्वार येथील महाकुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याद्वारे व्यापक धर्मप्रसार

४ ते १९ एप्रिल या कालावधीत लावण्यात आलेल्या सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र-जागृती केंद्राला ५००० हून अधिक जिज्ञासू आणि १०० हून अधिक संत यांनी भेट दिली.

भारत ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हावे, हीच आमची मागणी ! – महामंडलेश्‍वर महंत श्री श्री १००८ श्री रघुवीर दास महात्यागीजी, अखनूर, जम्मू-काश्मीर

प्रत्येक देश तेथील धर्माप्रमाणे चालतो; परंतु भारतात तसे होत नाही. जगात एकही ‘हिंदु राष्ट्र’ नाही. भारतही अद्याप ‘हिंदु राष्ट्र’ घोषित झालेले नाही. मोदी सरकारने हे कार्य लवकरात लवकर करावे. असे प्रतिपादन महामंडलेश्‍वर महंत श्री श्री १००८ श्री रघुवीर दास महात्यागीजी यांनी केले.

हिंदु धर्मरक्षणाचे कार्य करणार्‍यांना आमचे सदैव सहकार्य राहील ! – प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी

प.पू. शास्त्री वल्लभदास स्वामी हरिद्वार येथील श्री स्वामीनारायण आश्रमाचे संस्थापक आहेत. या आश्रमामध्ये वेदपाठशाळा, यज्ञशाळा आणि अन्नछत्र चालवले जाते.