‘डी’ कंपनीच्‍या तालावर नाचणार्‍या बॉलीवूडचे हिंदुविरोधी षड्‍यंत्र उद़्‍ध्‍वस्‍त करा ! – (सेवानिवृत्त) मेजर सरस त्रिपाठी

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने आयोजित ‘बॉलीवूड’चे पाकिस्‍तान प्रेम – पठाण ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

(टिप : ‘डी’ कंपनी म्‍हणजे कुख्‍यात दाऊद इब्राहिमची टोळी)

मुंबई – भारताच्‍या ‘संशोधन आणि विश्‍लेषण शाखे’च्‍या अर्थात् ‘रॉ’च्‍या अधिकार्‍याने पाकच्‍या ‘आय.एस्.आय.’ अधिकार्‍याचे साहाय्‍य घेतले, असे उदाहरण आतापर्यंत ऐकले नाही. व्‍यावहारिकदृष्‍ट्याही ते पटत नाही. ‘पठाण’ चित्रपटात ‘रॉ’ अधिकार्‍यांविषयी घृणा निर्माण करून ‘आय.एस्.आय.’ अधिकारी आणि पठाण यांच्‍याविषयी सहानुभूती निर्माण करण्‍याचा भ्रामक प्रचार केला आहे. भारतीय सैन्‍याला पाकिस्‍तान, बांगलादेश आणि चीन सीमेवर लढावे लागत आहे, तसेच देशातील अंतर्गत शत्रूंविरोधातही लढा द्यावा लागत आहे. या अंतर्गत शत्रूंपैकी बॉलीवूडमधील लोक भारताच्‍या विरोधात काम करत आहेत. बॉलीवूड पूर्वीपासूनच हिंदु पुजारी, साधू, संत, तसेच ‘हिंदू’ म्‍हणून ओळख असलेल्‍या पात्रांना खलनायक म्‍हणूनच दाखवत आलेली आहे.

(सेवानिवृत्त) मेजर सरस त्रिपाठी

हा एक षड्‍यंत्राचा भाग असून बॉलीवूड ‘डी’ कंपनीच्‍या (कुख्‍यात दाऊद इब्राहिमच्‍या टोळीच्‍या) तालावर नाचण्‍याचे काम करत आहे. आपल्‍याला आपली संस्‍कृती वाचवायची असेल, तर हे हिंदुविरोधी षड्‍यंत्र उद़्‍ध्‍वस्‍त केले पाहिजे, असे स्‍पष्‍ट प्रतिपादन देहली येथील (सेवानिवृत्त) मेजर, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते सरस त्रिपाठी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या ‘बॉलीवूड’चे पाकिस्‍तान प्रेम – पठाण ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.


हे पहा –

हिन्दू जनजागृति समिति आयोजित 🔊 विशेष संवाद
🚩 चर्चा हिन्दू राष्ट्र की..

🟢 बॉलीवुड का पाकिस्तान प्रेम – पठान


पाकविषयी चित्रपटातून चांगले चित्र निर्माण करणे, हा बॉलीवूडचा ‘बेशरम रंग’ ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्‍था

श्री. अभय वर्तक

‘पठाण’ चित्रपट दाखवणारी भारतातील विविध शहरांतील सिनेमागृहे ओस पडली आहेत, असे सामाजिक आणि अन्‍य अनेक माध्‍यमांतून स्‍पष्‍ट होत आहे. तरीसुद्धा शाहरूख खानच्‍या ‘पी.आर्. एजन्‍सी’द्वारे (जनसंपर्क कार्यालयाद्वारे) ‘पठाण चित्रपट सर्वत्र ‘हाऊसफुल’ झाला आहे’, असा खोटा प्रचार केला जात आहे. ‘पठाण चित्रपट यशस्‍वी झाला’, असा प्रचार करून ‘छत्रपती शिवाजी महाराज, मोदी, अमित शहा आदींना मानणारे पराभूत झाले आहेत’, अशा प्रकारे वातावरण निर्मिती केली जात आहे. ‘कश्‍मीर फाईल्‍स’सारखे काही अपवाद वगळता अनेक चित्रपटांत आतापर्यंत पाकिस्‍तानविषयी चांगले चित्र निर्माण करण्‍याचा प्रयत्न केला आहे. बॉलीवूडचा हा ‘बेशरम रंग’ ओळखण्‍याची आवश्‍यकता आहे.