‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वर्ष २००२ च्या गुजरात दंगलीविषयी सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष ठरवून सुद्धा त्यांना त्या दंगलीविषयी उत्तरदायी धरले जाणे आणि त्यावर ‘बीबीसी’ने केलेली ‘डॉक्युमेंट्री’ (माहितीपट) हे केवळ त्यांच्यावरील आक्रमण आहे’, असे संकुचित दृष्टीने न पहाता हे ‘हिंदूंवरील आक्रमण’ या दृष्टीने पहायला हवे. ‘भारत हिंदु राष्ट्र घोषित होऊ नये आणि भारताची प्रगती होऊ नये’, यासाठी देशविरोधी शक्ती कार्यरत आहे. ‘बीबीसी’ हा त्यांचा चेहरा आहे. ‘गोबेल्स नीती’चा (एखादी गोष्ट वारंवार सांगितली, तर ती लोकांना सत्य वाटू लागते) अवलंब करणार्या ‘बीबीसी’च्या ‘डॉक्युमेंट्री’वर केवळ बंदी आणून चालणार नाही, तर देशातील राष्ट्रभक्त लोकांसह सर्व संघटनांनी मिळून ‘बीबीसी’ला धडा शिकवायला हवा. (७.२.२०२३)