नामाने वासना नाहीशी कशी होते ?
‘नाम तेथे भगवंत आहे, मी नाही’, याची आठवण. भगवंत आहे तेथे ज्ञान आहे. ज्ञान आहे तेथे अज्ञान नाही. वासनेचा जन्म अज्ञानात आहे. अज्ञान नाही तेथे वासना नाही. भगवंत आहे तेथे अज्ञान नाही. नाम आहे तेथे भगवंत आहे; म्हणून नामाने वासना नाहीशी होते.