पश्‍चिम आशियातील शांतता हे एक अत्‍यंत दूरचे स्‍वप्‍न का आहे ?

मध्‍यपूर्वेतील इस्‍लामी देशांनी यहुदीविरोधी आतंकवाद म्‍हणून स्‍वीकारलेले देशांचे धोरण अनेक दशकांपासून अरब सैन्‍याने ख्रिस्‍ती आणि ज्‍यू लोकांविरुद्ध युद्धानंतर गमावलेल्‍या लढतींचे अनुकरण करत आहे. आदिवासी आणि आंतरराज्‍यीय वैमनस्‍यांमुळे अनेक संघर्ष झाले असले, तरी वर्ष १९४८ मध्‍ये इस्रायल या छोट्या देशाच्‍या स्‍थापनेपासून झालेल्‍या दंगलीने एक द्वेषपूर्ण धार्मिक रंग जोडला आहे. (गेल्‍या धर्मयुद्धांमध्‍ये असे पाहिले आहे.)

ऑगस्‍ट २०२४ नंतर इराणने हमास आणि हिजबुल्ला या आतकंवादी संघटनांना उघडपणे दिलेल्‍या पाठिंब्‍यामुळे ज्‍यू महिला अन् मुले यांचे अपहरण, तसेच बलात्‍कार यांसह निर्लज्‍जपणे घृणास्‍पद कारवाया झाल्‍या, ज्‍यामुळे अमेरिकेमधील विद्यापिठांतील अनेकांसह जगभरातील वेडे उत्‍साहित झाले आहेत. पश्‍चिम आशियामध्‍ये हा धगधगता हिंसाचार शतकानुशतके राहिला आहे. लोकसंख्‍येत झालेली वाढ आणि आधुनिक शस्‍त्रांच्‍या आगमनामुळे मृत्‍यू अन् विध्‍वंस वाढला आहे.

१. पश्‍चिम आशियामध्‍ये छोट्या देशांच्‍या निर्मितीमुळे मध्‍यपूर्वेमध्‍ये एकसंघ संस्‍कृतीची संकल्‍पना अशक्‍य

वर्ष १९१८ नंतर तुर्की ऑटोमन साम्राज्‍याचे विघटन झाले आणि अरबांना तुर्की शासकांपासून मुक्‍त केले गेले. तथापि फ्रान्‍स आणि इंग्‍लंड यांनी कृत्रिम पद्धतीने स्‍थापन केलेल्‍या पश्‍चिम आशियातील राज्‍यांच्‍या (छोटे देश) निर्मितीमुळे राज्‍यात विविध धर्म अन् संस्‍कृती यांच्‍या लोकसंख्‍येचे अत्‍यंत वैविध्‍यपूर्ण मिश्रण झाले आहे. या देशांमध्‍ये राज्‍य सोडून एकसंध संस्‍कृतीची संकल्‍पना आज मध्‍यपूर्वेत अशक्‍य आहे.

कर्नल रामकृष्‍णन् सी.एन्. (निवृत्त)

या प्रदेशातील कृत्रिमरित्‍या निर्माण झालेल्‍या देशांच्‍या चुकीच्‍या परिभाषित स्‍वरूपामुळे केवळ सीमा विवादच नव्‍हे, तर धार्मिक संबंधांवरून, जमाती, राज्‍यकर्ते आणि राजघराणी यांच्‍या सत्तेविरुद्ध लोकांच्‍या महत्त्वाकांक्षांवरून हिंसाचार झाला आहे. इजिप्‍त आणि लिबिया, मोरोक्‍को अन् मॉरिटानिया, जॉर्डन आणि सीरिया या देशांमध्‍ये संघर्ष झाले आहेत. इस्रायल विरुद्ध लेबनॉन, जॉर्डन, इराक, इराण, इराक, सौदी अरेबिया, येमेन, बहरीन आणि कतार यांविषयी तर काहीच बोलता येणार नाही.

२. मध्‍यपूर्वेतील देशांमध्‍ये शस्‍त्रास्‍त्रांची शर्यत असल्‍याने शस्‍त्रांचा महापूर

तेल आणि डॉलर यांच्‍या निरंतर पुरवठ्यामुळे मध्‍यपूर्व प्रदेशात शस्‍त्रास्‍त्रांची सतत शर्यत चालू आहे, तर शस्‍त्रास्‍त्र उत्‍पादक देशांना समृद्ध केल्‍याने संपूर्ण प्रदेश रहाण्‍यासाठी धोकादायक बनला आहे. सशस्‍त्र ड्रोनपासून क्षेपणास्‍त्रांपर्यंत विस्‍तारलेल्‍या अत्‍याधुनिक विविध प्रकारच्‍या शस्‍त्रांचा आज संपूर्ण मध्‍यपूर्वेत पूर आला आहे. इराण, सौदी अरेबिया, सीरिया आणि इराक या प्रमुख देशांकडून गुप्‍तपणे आण्‍विक शस्‍त्रांचा शोध चालू आहे.

३. अरब आणि इस्रायल यांच्‍यामधील संघर्षाची व्‍याप्‍ती

पॅलेस्‍टाईन आणि इस्रायल यांच्‍यातील समस्‍येने केवळ संपूर्ण मध्‍यपूर्वेला व्‍यापले नाही, तर दूरवरचे युरोपमधील देश आणि अमेरिका या देशांनाही वेठीस धरले आहे. मध्‍यपूर्वेतील सोव्‍हिएत युनियन (आताचा रशिया) आणि अमेरिका यांच्‍यातील महासत्तेविषयी स्‍पर्धा असण्‍याचेही परिणाम आहेत. अफगाणिस्‍तान आणि इतर देशांमध्‍ये रशियाविरुद्ध माध्‍यम सिद्ध करून अमेरिकेने देशांना आतून अन् बाहेरून अस्‍थिर करण्‍यासाठी विविध माध्‍यमे वापरण्‍याचा मार्ग दाखवला आहे.

४. शिया-सुन्‍नी यांच्‍या सत्तासंघर्षामध्‍ये इस्रायलला ओढणे

शिया-सुन्‍नी संघर्ष १ सहस्र वर्षांहून अधिक काळापासून चालू आहे आणि त्‍यात घट होण्‍याची चिन्‍हे दिसत नाहीत. जर काही असेल, तर शस्‍त्रांचे प्रमाण आणि त्‍यांच्‍या घातपातामुळे प्रतिस्‍पर्धी; परंतु समान धर्म स्‍वीकारणार्‍या पंथांचे धगधगते वक्‍तृत्‍व अन् अथक रक्‍तपात करण्‍याची भूक वाढली आहे, असे दिसते. आज जगात ५७ इस्‍लामी देश आहेत. सौदी अरेबिया, तुर्कीये, इजिप्‍त आणि पाकिस्‍तान हे सुन्‍नी देश इस्‍लामी जगतातील वर्चस्‍वासाठी आपापसांत स्‍पर्धा करत आले आहेत. त्‍यांना आता इस्‍लामचे जिहादी स्‍वरूप मानणार्‍या अयातुल्लाच्‍या अधिपत्‍याखाली असलेली आणि एक प्राचीन संस्‍कृती असलेल्‍या इराणच्‍या विरोधातही उभे केले जात आहे. इंडोनेशिया, मलेशिया आणि तुर्की यांच्‍यामध्‍ये लोकशाहीचे काहीसे प्रतिरूप आहे. इतर इस्‍लामी देश निरंकुश, लष्‍करी शासक आणि मुल्ला यांच्‍या अधिपत्‍याखाली आहेत. ‘अरब स्‍प्रिंग’ इत्‍यादींसारख्‍या निराश असलेल्‍या लोकसंख्‍येचे उठाव या कुप्रसिद्ध राजवटींद्वारे क्रूरपणे खाली पाडले गेले. कोट्यवधी कुर्द, बलुच आणि पश्‍तून यांची दडपशाही करण्‍याला इस्‍लामी जगात सुन्‍नी शासकांचा विशेष अधिकार मानला जातो.

विश्‍वासाच्‍या या रक्‍तरंजित जगात फक्‍त ९.५ दशलक्ष लोकसंख्‍या असलेला इस्रायल हा छोटा देश जगण्‍याची काय शक्‍यता आहे ? या इस्‍लामी राष्‍ट्रांनी लहानशा आणि असाहाय्‍य असलेल्‍या इस्रायलला सोयीस्‍कर स्‍वतःमध्‍ये ओढून फसवले आहे; कारण त्‍यांचे निरंकुश शासक त्‍यांच्‍या निरंकुश राजवटीविषयी आरडाओरड करणार्‍या लोकांचे लक्ष विचलित करण्‍याचा प्रयत्न करत आहेत.

५. स्‍वतःला कट्टर इस्‍लामी नेता सिद्ध करण्‍याच्‍या स्‍पर्धेत मुसलमानेतरांना लक्ष्य केले जाणे

स्‍वतःला इतरांपेक्षा कट्टर इस्‍लामी सिद्ध करण्‍यासाठी या इस्‍लामी देशांचे नेते त्‍यांच्‍या देशांमध्‍ये इस्‍लामचे सर्वांत कठोर प्रकार स्‍वीकारण्‍याचे प्रदर्शन करत आहेत आणि इतरांना त्‍यांची स्‍थिती सिद्ध करण्‍यासाठी हिंसक उपाययोजना करण्‍यास प्रवृत्त करत आहेत. त्‍यांच्‍या सहस्रोंच्‍या संख्‍येने असलेल्‍या मुल्लांसाठी जगभरातील सर्व मुसलमानेतर लक्ष्य ठरले आहेत. पवित्र ‘कुराणा’तील काही विधानांमुळे त्‍यांच्‍या द्वेषाच्‍या क्षेत्रात इस्रायलला विशेष स्‍थान आहे.

६. इस्रायलविरुद्ध कृती करण्‍यासाठी सर्व इस्‍लामी राष्‍ट्रांची एकजूट

अयातुल्लाच्‍या नेतृत्‍वाखालील ‘इस्‍लामिक रिपब्‍लिक ऑफ इराण’ने इस्रायल देश नष्‍ट करण्‍याच्‍या हेतूपुरस्‍सर प्रयत्न करतांना हमास, हुती आणि हिजबुल्ला या संघटनांच्‍या जिहाद्यांना शस्‍त्रास्‍त्रे देण्‍यास प्रारंभ केला आहे. इस्रायलवर अण्‍वस्‍त्रांचे आक्रमण करण्‍याविषयी पाकिस्‍तानी बोलण्‍यात मागे राहू नये आणि सौदी अरेबियातील माहितीनुसार महंमद बिन सलामने इस्रायलच्‍या विरोधात जवळजवळ १०० देशांना एकत्र केले आहे. पॅलेस्‍टाईन देशाच्‍या सूत्रावरून सौदी अरेबियामध्‍ये मोठी गर्दी झाली आहे. इतर अरब राष्‍ट्रे आणि अगदी रशिया, चीन यांच्‍या साहाय्‍यामुळे अन् पाठिंब्‍यामुळे मध्‍यपूर्वेतील राष्‍ट्रांमधील सशस्‍त्र संघर्षाची सध्‍याची स्‍थिती आणखी बिघडली आहे.

७. मध्‍यपूर्व आणि युक्रेन यांच्‍यातील संघर्ष थांबवण्‍यास डॉनल्‍ड ट्रम्‍प पावले उचलतील, अशी आशा !

तेल आणि डॉलर यांच्‍यावरील पकड, संयुक्‍त राष्‍ट्र अन् आंतरराष्‍ट्रीय न्‍यायालय यांवर बायडेन प्रशासनातील लूनी साम्‍यवादी विचारवंतांनी मध्‍यपूर्वेतील अनेक गोष्‍टी आणखी बिघडवल्‍या आहेत. आंतरराष्‍ट्रीय न्‍यायालयाने इस्रायलचे पंतप्रधान नेतान्‍याहू यांच्‍या अटकेसाठी काढलेले ‘वॉरंट’ हे संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या या कायदेशीर संस्‍थेने केलेल्‍या सर्वांत पक्षपाती कृतींपैकी एक आहे. डॉनल्‍ड ट्रम्‍प हे अमेरिकेच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षपदाची सूत्रे हाती घेतील आणि मध्‍यपूर्व अन् युक्रेन यांच्‍यात वाढणारा संघर्ष थांबवण्‍यासाठी पावले उचलतील, अशी जगातील समजूतदार सरकारे वाट पहात आहेत.

महंमद युनूस

८. बांगलादेशात महंमद युनूस यांना राष्‍ट्रप्रमुख करण्‍यामागे अमेरिकेचे धोरण

‘जमात-ए-इस्‍लामी’सारख्‍या आतंकवादी संघटनांनी बांगलादेशातील खालिदा झियाच्‍या ‘बांगलादेश नॅशनल पार्टी’सारख्‍या राजकीय पक्षांशी हातमिळवणी केली आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्‍या शेख मुजिबूर रेहमान यांची मुलगी शेख हसीना (१५ ऑगस्‍ट १९७५ या दिवशी शेख मुजिबूर रेहमान यांची पाकिस्‍तानी प्रशिक्षित अधिकार्‍यांनी हत्‍या केली) यांना देश सोडून पळून जाण्‍यास भाग पाडले आणि अमेरिकेने महंमद युनूस यांना देश कह्यात घेण्‍यासाठी बांगलादेशामध्‍ये स्‍थापित केले. लोकशाहीच्‍या नावाखाली महंमद युनूस यांनी स्‍वतःला बांगलादेश सरकारचा प्रमुख घोषित केले असून निवडणुका होण्‍यापूर्वी आणखी ४ वर्षे स्‍वतःच्‍या राजवटीची मागणी केली आहे.

९. महंमद युनूस यांच्‍याकडून बांगलादेशातील हिंदूंचे अस्‍तित्‍व संपवण्‍याचा प्रयत्न

स्‍वतःला बाह्यतः मऊ आणि सौम्‍य दर्शवतांना महंमद युनूस या प्रतिमानांकित व्‍यक्‍तीच्‍या कृतीतून ते एक बंदिस्‍त जिहादी असल्‍याचे दिसून येते. त्‍यांनी सत्ता हाती घेतल्‍यानंतर लगेचच हिंदूंविरुद्ध दंगल उसळली, शेकडो हिंदूंची घरे जाळण्‍यात आली, पुरुषांची कत्तल करण्‍यात आली, हिंदू महिलांचे अपहरण करून त्‍यांच्‍यावर बलात्‍कार करण्‍यात आले. युनूस यांच्‍या नेतृत्‍वाखालील बांगलादेश सरकारने हिंदु मंदिरे उध्‍वस्‍त करण्‍यासाठी गुंडांच्‍या टोळ्‍या सोडल्‍या आणि हिंदूंना दसरा, कालीपूजा, तसेच अन्‍य सण साजरे करण्‍यापासून रोखले.

हिंदूंवरील अत्‍याचार आजही चालूच आहेत. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचाराचा निषेध करण्‍यासाठी अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय महासंघ यांसह कोणताही पाश्‍चात्त्य देश पुढे आलेला नाही. बांगलादेशातील हिंदूंच्‍या हत्‍याकांडाच्‍या प्रयत्नांविषयी चिंता व्‍यक्‍त करणार्‍या अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्‍ट्राध्‍यक्ष डॉनल्‍ड ट्रम्‍प यांच्‍या ट्‍वीटमुळे आणि त्‍यांनी पदभार स्‍वीकारण्‍यापूर्वी यूनुस यांच्‍या बांगलादेश सरकारला परिस्‍थिती आणखी चिघळवण्‍यास प्रवृत्त केले आहे.

१०. हिंदूंनी स्‍वतःच्‍या जगण्‍याच्‍या हक्‍कासाठी ठाम उभे रहाण्‍याची आवश्‍यकता !

गेल्‍या काही मासांत जो बायडेन प्रशासनाने युनूस यांना दिलेला पाठिंबा, शेजारच्‍या भागात भारताला एकटे पाडण्‍याच्‍या आणि धर्मप्रचारक, तसेच इस्‍लामी आतंकवाद्यांशी समन्‍वय साधून नम्र हिंदूंच्‍या विरुद्ध कारवाई करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या निरंतर प्रयत्नांचे एक उदाहरण आहे. कट्टरपंथीय आणि जिहादी यांनी पसरवलेल्‍या हिंसा अन् द्वेष यांच्‍या जगात हिंदूंनी स्‍वतःच्‍या जगण्‍याच्‍या हक्‍कासाठी उभे रहाण्‍याची, तसेच समृद्ध होण्‍याची वेळ आली आहे.

– कर्नल रामकृष्‍णन् सी.एन्. (निवृत्त), देहली.