परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मानवाला व्याधींवर मात करता येण्यासाठी प्राणशक्तीवहनातील अडथळे शोधणे आणि हाताच्या बोटांच्या मुद्रा अन् नामजप करणे, हे शिकवणारी उपायपद्धत शोधली. पू. (श्रीमती) निर्मला दाते (वय ९१ वर्षे) या सध्या गंभीर आजारी (बेशुद्ध) असून त्यांच्यावर आधुनिक वैद्य औषधोपचार करत आहेत. याचसमवेत स्वतःची प्राणशक्ती अत्यल्प असतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. आजींसाठी नामजपादी उपाय शोधून दिले, तसेच अन्य साधकांना उपाय सांगून त्यांच्याकडून उपाय करवून घेतले. या वेळी नामजपादी उपाय करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन आणि साधकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. आध्यात्मिक पातळीनुसार जप वेगळा येणे
सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ : उपाय शोधत असतांना मला स्थान सापडते; पण जप सापडत नाही. असे का ?
प.पू. डॉक्टर : प्रत्येकाला उपायांसाठी करण्याचा जप वेगळा येऊ शकतो. तुम्हाला सापडलेला जप आणि मला सापडलेला जप वेगळा असू शकतो. याचे कारण म्हणजे उपाय शोधणार्यांची आध्यात्मिक पातळी वेगळी असल्यामुळे जप वेगळा येतो.
२. ‘शोधून आलेला जप उपायांसाठी का आला ?’, याचा अभ्यास करणे
डॉ. रूपाली भाटकर : मला जप शोधता येत नाही, तर उपाय कसे करायचे ?
प.पू. डॉक्टर : आपण प्रयत्न करायचा. जो जप येईल, त्या जपाने उपायांना आरंभ करायचा आणि ‘तो जप का आला ?’, याचा अभ्यास करायचा. जसे आजार्याला एखादा डॉक्टर औषध देतो. त्यामुळे आजार्याला थोडे बरे वाटते; पण विशेषज्ञाने (तज्ञ आधुनिक वैद्यांनी) प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) दिल्यावर अधिक परिणाम होतो. त्याप्रमाणे आपल्याला आलेल्या जपाने उपायांना आरंभ करावा.
३. पू. निर्मला दातेआजींच्या चेहर्यावर ३.७.२०२४ आणि ४.७.२०२४ या दिवशी दैवी कण दिसले.
४. ‘पू. दातेआजी श्वास घेत असतांना त्यांची उशी आणि डोकेही श्वासाच्या गतीने हलत आहे’, असे मला जाणवले.
५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘पू. आजी, डोळे उघडा’, अशी हाक मारा’, असा प्रयोग दिवसभरात करायला सांगणे
प.पू. डॉक्टर नामजपादी उपाय करत असतांना पू. दातेआजींनी डोळे किलकिले केले. त्यावर प.पू. डॉक्टरांनी मोठ्या आवाजात काही वेळा ‘पू. आजी, डोळे उघडा’, असे म्हणायला सांगितले; पण पू. आजींनी डोळे पूर्ण उघडले नाहीत. प.पू. डॉक्टरांनी पू. आजींना हाक मारतांना किमान २० वेळा ‘पू. आजी, डोळे उघडा’, अशी हाक मारा’, असा प्रयोग दिवसभरात करायला सांगितला. प्रयोग केल्यावर ‘पू. दातेआजींचा प्रतिसाद काय असतो ?’, याचा अभ्यास करायला सांगितला.
‘पू. आजी, डोळे उघडा’, अशी अनेक वेळा हाक मारूनही पू. आजींनी डोळे पूर्ण उघडले नाहीत.’
– सौ. ज्योती दाते (पू. आजींची सून, २०२४ ची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे), पुणे (४.७.२०२४)
|