‘चैत्र कृष्ण एकादशी (वरुथिनी एकादशी, ४.५.२०२४) या दिवशी कु. श्रिया राजंदेकर (वय १३ वर्षे) हिचा वाढदिवस झाला. त्या दिवशी ईश्वराच्या कृपेने माझ्या मनात श्रियाविषयी आलेले विचार येथे दिले आहेत.
१. कु. श्रियामध्ये देवीतत्त्व जाणवून तिला पाहिल्यावर श्री महालक्ष्मीदेवीच्या बालरूपाचे दर्शन होणे
मला कु. श्रियामध्ये देवीतत्त्व जाणवते. तिला पाहिल्यावर ‘ती श्री महालक्ष्मीदेवीचे बालरूप आहे आणि तिचे ‘श्रिया’ या नावासह सूक्ष्मातून ‘भार्गवी’ (श्री महालक्ष्मीदेवीचे नाव) हेही नाव आहे’, असे मला वाटते. मी श्रियाला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी भेटवस्तू आणि खाऊ दिला. तेव्हा मला ‘मी साक्षात् महालक्ष्मीलाच भेटवस्तू आणि खाऊ दिला’, असे जाणवले.
२. कु. श्रिया लक्ष्मीलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली असणे
अनेक बालसाधक उच्च स्वर्गलोक किंवा महर्लोक येथून पृथ्वीवर जन्माला आलेे आहेत; परंतु श्रिया मूळ लक्ष्मीलोकातील असून ती श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्यात सहभागी होण्यासाठी ‘लक्ष्मीलोकातून पृथ्वीवर जन्माला आली आहे’, असे मला जाणवते.
श्रिया, लक्ष्मीस्वरूप असे तुझे बालरूप ।
श्रिया, लक्ष्मीस्वरूप असे तुझे बालरूप ।
निर्मळ तुझे अंतरंग देवीस्वरूप ॥ १ ॥
‘प्रेमभाव, सेवावृत्ती’, असे अनेक सद़्गुण ।
तुझ्यात आहेत असे अनेक दैवी गुण ॥ २ ॥
तुझी वाटचाल चालू आहे संतपदाकडे ।
तू मार्गक्रमण करत आहेस मोक्षमुक्तीकडे ॥ ३ ॥
तुला लाभले विष्णुस्वरूप गुरुमाऊलीचे कृपाशीर्वाद ।
तुला लाभला समस्त देवीदेवतांचा कृपाप्रसाद’ ॥ ४ ॥
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.६.२०२४)
३. ‘कु. श्रियामध्ये अहं अल्प असून दैवी गुण असणे
श्रिया ही केवळ जन्मानेच नाही, तर गुणांनीही दैवी आहे. तिच्यात स्वभावदोष आणि अहं अल्प आहे. तिच्यात पुष्कळ दैवी गुण आहेत.
४. ‘कु. श्रियाला संतपदापर्यंत जाण्यासाठी पू. वामन राजंदेकर मार्गदर्शन करणार आहेत’, असे जाणवणे
श्रियाचा लहान भाऊ पू. वामन राजंदेकर (सनातनचे दुसरे बालसंत, वय ५ वर्षे) हे जन्मतःच संत आहेत. श्रियाचा जन्म पू. वामन यांना सांभाळण्यासाठी झाला असून ती त्यांचे मार्गदर्शन घेऊन ‘लवकरच संतपद गाठणार आहे’, असे मला देवीने सांगितले.
‘ईश्वराने श्रिया या दैवी बालसाधिकेचे वैशिष्ट्य मला उलगडून दाखवले’, यासाठी मी ईश्वराच्या चरणी अनन्यभावाने कृतज्ञ आहे.
– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.६.२०२४)
‘टॅरो कार्डरिडर’ आणि ‘ऑरा ॲनालायझर’ यांनी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. श्रिया राजंदेकर (वय १३ वर्षे) हिला केवळ पाहून तिच्याविषयी काढलेले उद्गार !
‘काही दिवसांपूर्वी आमची कर्नाटक येथील एका ‘टॅरो कार्ड रिडर’ आणि ‘ऑरा अॅनालायझर’ यांच्याशी भेट झाली. त्यांना समोरच्या व्यक्तीची साधना आणि व्यक्तिमत्व याला अनुसरून त्या व्यक्तीभोवती विविध रंगवलय दिसतात. ‘टॅरो कार्ड’ हे ज्योतिषशास्त्राप्रमाणेच एक शास्त्र आहे. यात व्यक्तीच्या मनातील प्रश्नांना अनुसरून काही विशिष्ट चित्राकृती असलेले ‘कार्ड्स’ काढले जातात. त्या ‘कार्ड्स’ वरून ते व्यक्तीचा भूतकाळ आणि भविष्यकाळ सांगतात.
१. ‘टॅरो कार्ड रिडर’ आणि ‘ऑरा अॅनलायझर’ असलेल्या व्यक्तीला कु. श्रिया राजंदेकर हिच्याविषयी जाणवलेली सूत्रे
‘आम्ही ‘टॅरो कार्ड रिडर’ आणि ‘ऑरा अॅनलायझर’ यांच्या घरी गेलो होतो. त्या एक महिला असून ध्यानसाधना करतात. ‘आम्हीही साधना करतो’, हे कळल्यावर त्यांनी आमच्या समवेत काही काळ ध्यान केले. तेव्हा त्यांना श्रियाविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१ अ. श्रियाभोवती निळ्या आणि पांढर्या रंगाचे वलय दिसणे : ‘कु. श्रियाकडे पहिल्यांदा पाहिल्यावर मला तिच्याभोवती निळ्या आणि पांढर्या रंगाचे वलय दिसले. तिचा चेहरा सामान्य नसून तिचेे सौंदर्य दैवी आहे. तिच्याभोवती सतत प्रकाश दिसतो.
१ आ. कु. श्रियाच्या जागी लक्ष्मीदेवी दिसणे : ‘श्रिया माझ्या देवघरासमोर उभी राहून प्रार्थना करत होती, तेव्हा ‘देवघरासमोर प्रत्यक्ष श्री लक्ष्मीदेवीच उभी असून तीच माझ्यासाठी प्रार्थना करत आहे’, असे मला वाटले.
१ आ १. कु. श्रियाच्या आज्ञाचक्रात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे : आम्ही एकत्र ध्यानाला बसलो होतो. ध्यानानंतर ‘टॅरो कार्ड रिडर’ आणि ‘ऑरा अॅनलायझर’ असलेल्या व्यक्तीने श्रियाला विचारले, ‘ध्यानाच्या वेळी काय जाणवले ?’ तेव्हा श्रियाने सांगितले, ‘‘मला माझ्या आज्ञाचक्रावर चांगल्या संवेदना जाणवल्या.’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘मला तिच्या आज्ञाचक्रात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन ती कार्यरत झाली’, असे जाणवले.’’
१ आ २. श्रिया एक पवित्र जीव ! : ‘श्रिया हा एक शुद्ध आणि पवित्र जिवात्मा आहे. ईश्वराच्या इच्छेने तिने पृथ्वीवर विशिष्ट कार्यासाठी जन्म घेतला आहे.
१ आ ३. श्रियामध्ये महालक्ष्मीदेवीचे तत्त्व असून काळानुसार ते जागृत होणार असणे : श्रियामध्ये श्री महालक्ष्मीदेवीचे तत्त्व असून पुढे पुढे ते तत्त्व आवश्यकतेनुसार जागृत होईल. ती दैवी बालिका असून तुम्हाला तिच्यातील दैवी गुण भविष्यात पुष्कळ मोठ्या प्रमाणात बघायला मिळतील. तिच्यातील त्या दैवी गुणांचा समाजाला लाभ होईल.
१ इ. श्रिया आणि पू. वामन यांच्यातील बहीण-भावाचे अद्वितीय नाते ! : मागील जन्मात श्रियाने पू. वामन यांची पुष्कळ काळजी घेतली होती. पू. वामन यांनी तिचे प्रेम आणि भक्ती बघून या जन्मात तिचे धाकटे भाऊ म्हणून जन्म घेतला आहे. पू. वामन नेहमीच श्रियाचे सर्व प्रकारे रक्षण करतील. ते नेहमीच तिच्या पाठीशी उभे रहातील. त्यांच्यातील बहीण-भावाचे नाते अद्वितीय नाते म्हणून ओळखले जाईल.
१ ई. पू. वामन श्रियाला आध्यात्मिक उन्नतीसाठी साहाय्य करणार आहेत.
१ उ. श्रिया संतपदी विराजमान होणार असणे : श्रियाही पू. वामन यांच्याप्रमाणे लवकरच संतपदावर आरूढ होईल. ‘सूक्ष्मातून श्रिया संतपदापर्यंत पोचली आहे. आता केवळ पृथ्वीवरील काळाप्रमाणे ही घटना घडेल’, असे मला दिसले.
१ ऊ. श्रियाचा जन्म ईश्वरी इच्छेने सूक्ष्म जगातील काही जिवांच्या उद्धारासाठी झाला असणे : सूक्ष्म जगातील काही विशिष्ट जिवांच्या उद्धारासाठी श्रिया आणि पू. वामन यांची आणि आमची भेट झाली. हा योगायोग नसून पूर्वनियोजित घटना आहे. ही ईश्वराची इच्छा आहे.’
२. ‘देवानेच कु. श्रियाची ही वैशिष्ट्ये लक्षात आणून दिली’, असे जाणवणे
त्यांचे हे बोलणे ऐकून मला पुष्कळ आश्चर्य वाटले; कारण आम्ही त्यांना श्रियाविषयी काहीच सांगितले नव्हते. आता मे २०२४ मध्ये सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री मधुरा भोसले यांनीही मला श्रियाविषयी अशीच सूत्रे सांगितली. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘यापूर्वी अनेक वेळा मधुराताईंशी भेट होऊनही आमचा असा संवाद कधीच झाला नव्हता. मग आताच हे सर्व कसे जुळून आले ? हे सर्व देवाचेच नियोजन आहे.’
३. ‘टॅरो कार्ड रिडर’ आणि ‘ऑरा अॅनलायझर’ यांनी अन् सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या सुश्री मधुरा भोसले यांनी कु. श्रिया राजंदेकर हिच्याविषयी सांगितलेली सर्व सूत्रे सारखीच असणे
‘टॅरो कार्ड रिडर’ आणि ‘ऑरा अॅनलायझर’ यांनी श्रियाला बघताक्षणीच त्यांना जाणवलेली सूत्रे आम्हाला सांगितली. त्यानंतर मे २०२४ मध्ये सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या आणि ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री मधुरा भोसले यांनीही श्रियाच्या संदर्भात त्यांना जाणवलेली सूत्रे मला सांगितली. त्या दोघींनी श्रियाविषयी सांगितलेली बहुतेक सर्व सूत्रे एकसारखीच आहेत. ‘टॅरो कार्ड रिडर’ आणि ‘ऑरा अॅनलायझर’ यांनी श्रियाला केवळ काही वेळ पाहिले होते. त्यांचा आणि सुश्री मधुरा भोसले यांचा एकमेकींशी काहीच संबंध नाही, तरीही ‘त्या दोघींनी सांगितलेली सर्व सूत्रे समान असणे’, ही केवळ ईश्वरेच्छा आहे’, असे मला जाणवले.
४. कृतज्ञता
मला ‘टॅरो कार्ड रिडर’ आणि ‘ऑरा अॅनालायझर’ अन् मधुराताई यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली. या सर्व सूत्रांसाठी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. ‘हे गुरुदेवा अशीच अखंड कृपादृष्टी श्रियावर आणि आम्हा सर्व साधकांवर असू दे’, हीच आपल्या कोमल चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– सौ. मानसी राजंदेकर (वय ४० वर्षे) फोंडा, गोवा. (१२.६.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |