रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमामध्ये अंभोरेआजींनी (टीप १) ८० व्या वर्षी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे’, असे कळले. नंतर लक्षात आले, ‘पू. चत्तरसिंग इंगळे (टीप २) यांनी ८० व्या वर्षी ७१ टक्के, तसेच पू. सखदेवआजी (टीप ३) आणि मी स्वतः (पू. अप्पाकाका [टीप ४]) ८० व्या वर्षी ७० टक्के पातळी गाठली.
म्हातारपणी आध्यात्मिक पातळी ६० किंवा ७० टक्के झाली, तर आयुष्याची अधिक वर्षे शेष राहिली नसल्यामुळे अधिक आध्यात्मिक पातळी वाढण्याचा संभव पुष्कळ न्यून होतो; परंतु त्याचा एक लाभ, म्हणजे आध्यात्मिक पातळी घसरण्याचा संभवही पुष्कळ न्यून होतो.
त्याचे कारण मन आकर्षित करणारे, इंद्रियजन्य सुख देणारे विषय केवळ पृथ्वी आणि स्वर्ग यांतच उपलब्ध असतात; परंतु उन्नत ६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी झाल्यावर महर्लोकात अन् ७० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी झाल्यावर जनलोकात जात असल्यामुळे आध्यात्मिक पातळी पुष्कळ संथ गतीने वाढत असली, तरी आध्यात्मिक घसरगुंडी होण्याचा संभव नसतो; मात्र अहंमुळे पातळी न्यून होऊ शकते.’
– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका), चेंबूर, मुंबई. (१७.१०.२०१३)
टीप १ – वर्ष २०२४ मध्ये श्रीमती अन्नपूर्णा अंभोरेआजी (वय ९१ वर्षे) यांची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के आहे.
टीप २ – पू. (कै.) चत्तरसिंग इंगळे यांनी २९.९.२०२२ या दिवशी देहत्याग केला.
टीप ३ – सद़्गुरु (कै.) आशालता सखदेवआजी यांनी १७.८.२०१६ या दिवशी देहत्याग केला. देहत्यागानंतर त्यांनी सद़्गुरुपद प्राप्त केले.
टीप ४ – हे लिखाण सद़्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले यांनी देहत्याग करण्यापूर्वीचे आहे. तेव्हा ते संत पातळीला होते. ९.११.२०१३ या दिवशी त्यांनी देहत्याग केला. देहत्यागानंतर त्यांनी सद़्गुरुपद प्राप्त केले. (ते संत असतांनाचे लिखाण असल्यामुळे लेखाचे लेखक म्हणून त्यांचे नाव पू. डॉ. वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका) असेच ठेवले आहे. – संकलक)