गोंदिया शिवशाही बस अपघात प्रकरणातील वाहनचालकाकडून ७ वेळा अपघात झाल्याची माहिती समोर !
आरोपीला आधीच्याच गुन्ह्यात कठोर शिक्षा झाली असती, तर गोंदिया शिवशाही बस अपघात प्रकरणातील मृत्यू टाळता आले असते ! दोषी आढळल्यानंतरही कोणतीही कारवाई न करणार्या दायित्वशून्य अधिकार्यांनाही दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई करायला हवी.