विधानसभेतील भाजपचे गटनेते ठरवण्‍यासाठी पर्यवेक्षकांची नियुक्‍ती !

५ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदानावर मुख्‍यमंत्रीपदाचा शपथविधी होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्‍थित रहाणार आहेत.

मुंबई – महाराष्‍ट्र विधीमंडळातील भाजपचे गटनेते ठरवण्‍यासाठी पर्यवेक्षक म्‍हणून गुजरातचे माजी मुख्‍यमंत्री विजय रूपाणी आणि केंद्रीयमंत्री निर्मला सीतारमण यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. भाजपचे राष्‍ट्रीय सचिव अरुण सिंह यांनी २ डिसेंबर या दिवशी माहिती दिली. ४ डिसेंबर या दिवशी पर्यवेक्षक भाजपच्‍या खासदारांशी संवाद साधणार आहेत.