Bangladeshi Hindus : बांगलादेशात अल्पसंख्य हिंदूंच्या झालेल्या नरसंहाराच्या विरोधात तुम्ही बोलाल का ? – मोहनदास पै, ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक
बांगलादेशात अल्पसंख्य हिंदूंचे हत्याकांड चालू आहे. तुम्ही तेथील अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार महंमद युनुस यांचे समर्थक आहात, तर हिंदूंच्या नरसंहारावरून तुम्ही एक शब्दही का उच्चारला नाही, असा प्रश्न ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक मोहनदास पै यांनी भारतीय-अमेरिकी उद्योगपती विनोद खोसला यांना केला. त्यांनी हे विधान ‘एक्स’वर केले आहे.