बेस्ट बसमधील सूचनांतील व्याकरणाच्या चुका सुधारण्याचा खर्च उत्तरदायींकडून वसूल करा !
‘मुंबईला सतत धावत्या ठेवणार्या ‘बेस्ट’ (बृहन्मुंबई विद्युत् पुरवठा आणि परिवहन उपक्रम) बसगाड्यांमध्ये प्रवाशांना विविध प्रकारच्या सूचना देणार्या पाट्या असतात. या सूचनांमध्ये मराठी भाषेच्या संदर्भातील शुद्धलेखन आणि व्याकरण यांच्या अनेक चुका असल्याचे लक्षात आले आहे…