१. रामनाथी आश्रमातील स्वागतकक्षात आलेल्या अनुभूती !
अ. ‘मी प्रथमच रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. आश्रमात पाऊल ठेवताच माझा भाव जागृत झाला. ‘मी जणूकाही साक्षात् विष्णुधामांत आले आहे’, असे मला वाटले. मला आश्रमात पुष्कळ थंड वातावरण जाणवले आणि शांत वाटत होते.
आ. मी आश्रमाच्या स्वागतकक्षात असलेले श्रीकृष्णाचे चित्र पाहिले. तेव्हा मला असे वाटले, ‘जणू श्रीकृष्ण माझ्याकडे पाहून हसत आहे.’
इ. आश्रमाच्या स्वागतकक्षात असलेले प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र पहातांना मला त्यांच्या छायाचित्रात चैतन्य, सजीवता आणि तेज जाणवले.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे दर्शन झाल्यावर आलेल्या अनुभूती !
अ. मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे दर्शन झाले. तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती झाली.
आ. त्या सभागृहात आल्या. तेव्हा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.
इ. त्यांच्या चेहर्यावर पुष्कळ तेज, भाव आणि चैतन्य होते.
ई. त्यांना पहातांना ‘माझ्या डोळ्यांवर मोठ्या दिव्याचा (लाईटचा) प्रकाश पडतो आहे’, असे मला वाटले आणि त्यामुळे माझे डोके जड झाले.
उ. मला त्यांच्या आजूबाजूला, तसेच संपूर्ण शरिराभोवती सूर्यकिरणांसमान सात्त्विक पिवळसर प्रकाश जाणवत होता.
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात आलेल्या अनुभूती !
अ. मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी मला गुरुदेव साक्षात् श्री दत्तगुरु, श्रीकृष्ण आणि श्रीविष्णु यांच्या रूपात दिसले. तेव्हा माझी भावजागृती झाली.
आ. मला त्यांचे हात आणि चेहरा यांचा रंग कमळाच्या गुलाबी रंगाप्रमाणे दिसत होता.
इ. मला त्यांच्या सत्संगात फुलांचा दिव्य सुगंध आणि शीतल वारे जाणवत होते.
ई. माझ्या हातांचा रंग पिवळसर सोनेरी आणि तळहाताचा रंग पूर्ण गुलाबी वाटत होता.
हे गुरुदेव, मला तुम्ही या सुंदर अनुभूती दिल्याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– कु. मयुरी सुधीर जोशी, माळशिरस, सोलापूर.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |