पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७७ वर्षे) यांच्या लेखनशैलीचा गौरव करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे साधकाने लिहिलेले पत्र !   

पू. शिवाजी वटकर

पू. वटकरकाका,

नमस्कार.

८.८.२०२४ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेला पू. गडकरीकाका (सनातनचे १९ वे संत पू. रमेश गडकरी, वय ६७ वर्षे) यांच्याविषयी आपण लिहिलेला लेख वाचला. फारच छान आणि समर्पक लेख आहे. आपल्या ठायी असलेल्या लेखनशैलीच्या दैवी देणगीची प्रशंसा करावी, तितकी अल्पच आहे. किंबहुना त्याची योग्य शब्दांत मांडणी करण्यास मी असमर्थ आहे.

श्री. कृष्णकुमार जामदार

‘समोरच्या व्यक्तीमध्ये असलेली गुणवैशिष्ट्ये, कौशल्ये, कार्यक्षमता, वागणूक, ज्ञानसंपदा इत्यादींची बारकाईने नोंद घेणे आणि त्यांविषयी समर्पक शब्दांत लिखाण करणे’, हे कौशल्य आपल्या ठायी आहे. विशेषतः आपली साहित्यिक क्षेत्राच्या बाहेरील कार्यप्रवृत्ती ज्ञात असतांना आपली त्यामागे असलेली तळमळ, चिकाटी आणि गहन अभ्यासू वृत्ती कारणीभूत आहे. ‘प.पू. गुरुमाऊलींची कृपा आणि माता सरस्वतीदेवीचा आशीर्वाद आपणांस लाभला आहे’, हे प्रकर्षाने जाणवते.

सद्गुरु, संत, साधक किंवा अन्य क्षेत्रातील कोणतीही व्यक्ती असो, तिच्या संदर्भातील आपले लिखाण यथार्थ आणि अचूक असते. ते वाचकांना प्रेरणादायी ठरते. आपल्या लेखनशैलीतून अभ्यासकांना पुष्कळ शिकायला मिळते. आपले विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण लेख आपले साहित्यिक प्रभुत्व सिद्ध करतात, तसेच ते इतरांना मार्गदर्शकही ठरतात.

‘पू. काका, ‘आम्ही भाग्यवंत आहोत की, आपल्यासारख्या संतरत्नांचे सान्निध्य आम्हाला लाभत आहे. प्रसंगोपात (प्रसंगानुसार) मार्गदर्शनही मिळत आहे’, याबद्दल मी प.पू. गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.

आपला,

– श्री. कृष्णकुमार जामदार (वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.८.२०२४)