१. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ स्वभावदोषांना त्रिशुळाने मारत आहेत’, असे जाणवणे
‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सत्संग घेत होत्या. तेव्हा ‘त्यांच्यात तेजतत्त्व कार्यरत आहे’, असे मला जाणवले. मला त्यांच्यातील तारक आणि मारक शक्तींचे दर्शन झाले. त्या म्हणाल्या, ‘‘आपल्याला स्वभावदोषांना समूळ नष्ट करायचे आहे.’’ त्या वेळी ‘त्या स्वभावदोषांना त्रिशुळाने मारत आहेत’, असे मला जाणवले.
२. परात्पर गुरु डॉक्टरांच्या त्वचेच्या रंगांत झालेल्या पालटांमुळे निरनिराळ्या तत्त्वांच्या अनुभूती येणे
एकदा मला परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन झाले. तेव्हा त्यांची त्वचा गुलाबी झाली होती आणि ‘त्यांच्यात प्रीती हे तत्त्व कार्यरत आहे’, असे मला वाटले. नंतर मला त्यांची त्वचा पिवळी झाली आहे, असे दिसले. त्या वेळी पुष्कळ सात्त्विकता आणि चैतन्य जाणवत होते. ‘ते चैतन्य त्यांच्या वाणीतून आम्हाला मिळत आहे’, असे मला जाणवले.
३. युवा साधक बोलत असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवलेच त्यांच्यातून बोलत आहेत’, असे वाटणे
युवा साधक अनुभूती सांगत असतांना, ‘साधक काहीच बोलत नसून, गुरुदेवच त्यांच्यातून बोलत आहेत’, असे मला वाटत होते.
या सर्व अनुभूती दिल्याबद्दल गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. गिरिजा शशिकांत शेंडे, कोल्हापूर
साधिकेचे आजोबा प्रतिदिन भावपूर्ण पूजा करत असल्याने देवीच्या चित्रामध्ये जिवंतपणा जाणवणे‘आमच्या घरामध्ये श्री महालक्ष्मीदेवीचे चित्र आहे. माझे आजोबा (आधुनिक पशूवैद्य भूपाल भाऊसाहेब शेंडे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) प्रतिदिन त्याची पूजा करतात. ते पूजा करत असतांना मला त्यांच्यामध्ये पुष्कळ भाव जाणवतो. मला ‘चित्रातील देवीच्या साडीच्या निर्यांची जागा पालटते’, असे जाणवते. सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाड्ये आमच्या घरी सत्संग घेण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘श्री महालक्ष्मीदेवीच्या चित्रात पुष्कळ जिवंतपणा जाणवतो आणि साडीच्या निर्यांमध्येही पुष्कळ सजीवता जाणवते.’’ – कु. गिरिजा शशिकांत शेंडे, कोल्हापूर |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |