श्री तिरुपती देवस्थानच्या प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळणे, हे हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेवर जाणीवपूर्वक केलेले आक्रमण ! – हिंदु जनजागृती समिती

प्रसादाच्या लाडूंमध्ये भेसळ करणार्‍यांवर तात्काळ गुन्हा नोंद करण्याची मागणी  !

बांगलादेशासमवेतचे सर्व क्रिकेट सामने तात्काळ रहित करा !

अशी मागणी का करावी ? सरकार स्वतःहून हे सामने रहित का करत नाही ?

थोडक्यात महत्त्वाचे : २० वर्षे फरार धर्मांध आरोपी अटकेत !….मैत्रिणीने भेटण्यास नकार दिल्याने तरुणाची आत्महत्या !

११ वर्षाच्या मुलाला आत्महत्या करणे शक्य व्हावे, अशी समाजाची झालेली स्थिती पालटण्यासाठी प्रत्येक शाळेत धर्मशिक्षण अपरिहार्य !

नवरात्रोत्सवात श्री सप्तशृंगीदेवी मंदिर २४ घंटे खुले रहाणार !

श्री सप्तशृंग गडावर नवरात्रोत्सवाच्या वेळी दर्शनासाठी मंदिर २४ घंटे खुले रहाणार आहे. ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत प्रांताधिकारी अनुकुरी नरेश यांनी येथील ट्रस्टच्या सभागृहात विविध विभागांच्या प्रमुखांची आढावा बैठक घेतली. या वेळी विविध विषयांवर चर्चा करून प्रतिवर्षीप्रमाणे उत्सव साजरा करण्याचे ठरवण्यात आले आहे.

मुंबईतील कामाठीपुरा परिसराचा पुनर्विकास होणार !

येथील बहुसंख्य नागरिक हे बाहेरील राज्यातून आलेले आहेत. त्यांचा विकास होऊन त्यांना घरे मिळू शकतात; परंतु कित्येक मराठी माणसांना घरांच्या प्रचंड किमतींमुळे मुंबईबाहेर जावे लागत आहे, हे वास्तव आहे !

२४ ते २९ सप्टेंबर या काळात मुंबईत मुसळधार पाऊस

२७ सप्टेंबरपर्यंत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सव्वा घंटा ‘रस्ता बंद’ आंदोलन !

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी गेल्या ६ दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण चालू आहे. या उपोषणाच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने २२ सप्टेंबर या दिवशी जिजाऊ चौक येथे सव्वा घंटा ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले.

निवडणूक आयोगाचे पथक महाराष्ट्रात येणार !

निवडणूक आयोगाचे पथक २७ सप्टेंबरला राजकीय पक्ष, निवडणूक अधिकारी, निवडणुका राबवणार्‍या यंत्रणा, तसेच पोलीस अधिकारी यांची भेट घेतील, तर २८ सप्टेंबरला दुपारी ४.३० वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील शैक्षणिक संस्थेसह हिंजवडीत गांजा विक्री !

वाढती गांजा विक्री म्हणजे शिक्षण आणि संस्कृती यांचे माहेरघर असणार्‍या पुणे जिल्ह्याला लागलेले गालबोटच होय !

१.५८ कोटी रुपयांचे २.२८६ किलो सोने आणि हिरे जप्त !

अशा प्रकारे प्रतिदिन तस्करी करणार्‍यांना अटक केल्याची वृत्ते येतात; पण त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली, हेही उघड व्हायला हवे, तरच अशा प्रकारांना आळा बसेल !