हिंदु जनजागृती समितीची आंदोलनाद्वारे मागणी
जळगाव, २२ सप्टेंबर (वार्ता.) – बांगलादेशासमवेत भारताचे क्रिकेटचे दोन कसोटी सामने भारतात आयोजित करण्यात आले आहेत. ही अत्यंत चीड आणणारी गोष्ट आहे. क्रिकेट खेळणे म्हणजे ‘रोम जळत असतांना नीरो फिडल वाजवत होता’, असा हा प्रकार आहे.
बांगलादेशातील हिंदूंवरील अद्यापही अत्याचार चालू आहेत. तेथील शेकडो हिंदूंच्या चिता अद्याप शांत झालेल्या नाहीत, मग असे असतांना क्रिकेटचे सामने आयोजित करणे हा हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा संतापजनक प्रकार आहे. हे सामने तात्काळ रहित करावेत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवतीर्थ, कोर्ट चौकात निदर्शने करण्यात आली. संबंधित मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून मा. पंतप्रधान, मा केंद्रीय क्रीडामंत्री, मा. परराष्ट्रमंत्री, तसेच ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष यांना पाठवण्यात आले.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी ? सरकार स्वतःहून हे सामने रहित का करत नाही ? |