मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक २७ आणि २८ सप्टेंबर या दिवशी महाराष्ट्र दौर्यावर येणार आहे. या दौर्याविषयी मुख्य निवडणूक आयोगाने राज्य मुख्य निवडणूक अधिकार्याला पत्र पाठवले आहे. या दोन दिवसांच्या दौर्यात केंद्रीय निवडणूक आयोग राज्यातील प्रमुख अधिकार्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर विधानसभा निवडणुकीचे दिनांक घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणूक आयोगाचे पथक २७ सप्टेंबरला राजकीय पक्ष, निवडणूक अधिकारी, निवडणुका राबवणार्या यंत्रणा, तसेच पोलीस अधिकारी यांची भेट घेतील, तर २८ सप्टेंबरला दुपारी ४.३० वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या वर्तमान विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर २०२४ या दिवशी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे राज्यात नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.