खासगी वाहनांसाठी रस्ता बंद !
नाशिक – श्री सप्तशृंग गडावर नवरात्रोत्सवाच्या वेळी दर्शनासाठी मंदिर २४ घंटे खुले रहाणार आहे. ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत प्रांताधिकारी अनुकुरी नरेश यांनी येथील ट्रस्टच्या सभागृहात विविध विभागांच्या प्रमुखांची आढावा बैठक घेतली. या वेळी विविध विषयांवर चर्चा करून प्रतिवर्षीप्रमाणे उत्सव साजरा करण्याचे ठरवण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवासाठी प्रत्येक विभागाने दायित्व चोख पार पाडण्याच्या दृष्टीने आणि पुढील बैठकीत आढावा सादर करण्याच्या सूचना प्रांताधिकारी नरेश यांनी दिल्या. गडावर येणार्या भाविकांची संख्या लक्षात घेत ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत नांदुरी ते सप्तशृंगगड रस्ता खासगी वाहनांसाठी बंद असेल. १०० बसगाड्या प्रवाशांना ने-आण करतील. ५ ठिकाणी आरोग्य पडताळणी आणि उपचार केंद्र चालू ठेवण्यात येईल. या बैठकीसाठी ट्रस्टचे कुणीही विश्वस्त उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.