‘राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघा’च्या वतीने घरातील श्री गणेश आणि श्री महालक्ष्मी यांच्या सजावटीविषयी स्पर्धा !

नगर – राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या अहिल्यानगर शहर शाखेच्या वतीने शहरातील गणेशभक्तांसाठी घरातील श्री गणेशमूर्ती आणि श्री महालक्ष्मी यांच्या समोर केलेल्या सजावटीविषयी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे शहराध्यक्ष श्री. महेश गुगळे यांनी दिली.

स्पर्धकांनी श्री गणपतीसमोरील सजावट आणि श्री महालक्ष्मीदेवीच्या सजावटीचे छायाचित्रे आणि व्हिडिओ काढून पाठवतांना घरातील एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी करावी. ९७६२४५९४४४ किंवा ९४२२४९५२८९ किंवा ८३९००९५८५९ या भ्रमणध्वनीवर छायाचित्रे आणि व्हिडिओ पाठवावेत. शहरातील अधिकाधिक गणेशभक्तांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे शहराध्यक्ष श्री. महेश गुगळे आणि उपाध्यक्ष श्री. वरद मुठाळ यांनी केले आहे.

घरातील गणपतीची आणि महालक्ष्मीची आकर्षक सजावट केलेल्या भाविकांमधून अनुक्रमे प्रत्येकी प्रथम ३ क्रमांक आणि ३ उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात येतील. या दोन्हीही स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश विनामूल्य असून सर्व सहभागींना आकर्षक सन्मानपत्र समारंभपूर्वक देवून गौरवण्यात येणार आहे.