छत्रपती संभाजीनगर येथे पहिले सामूहिक अथर्वशीर्ष पठण !

छत्रपती संभाजीनगर – विद्येची देवता मानल्या गेलेल्या श्री गणेशाची आराधना करण्यासाठी श्री संस्थान गणपति आणि दैनिक ‘दिव्य मराठी’ यांच्या वतीने महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण आयोजित करण्यात आले होते. या वेळी ३५ संस्था-संघटनांच्या महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. राजाबाजार येथील ग्रामदैवत श्री संस्थान गणपतीसमोर हा भव्य कार्यक्रम पार पडला. श्री संस्थान गणेश ट्रस्ट, स्वामी समर्थ सेवा केंद्र, तुकामाई गाथा मंडळ, विहिंप सहभागी झाले होते. सामूहिक अथर्वशीर्ष पठण करतांना पुष्कळ प्रसन्न वाटल्याचे अनेक महिलांनी सांगितले.

ब्राह्मण मंचच्या विजया कुलकर्णी म्हणाल्या की, पुढील वर्षीही अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करावा. सामूहिक अथर्वशीर्ष पठणात महिलांना केंद्रस्थानी ठेवल्याबद्दल अनुराधा पुराणिक यांनी दैनिक ‘दिव्य मराठी’चे आभार मानले.