चिखली (पुणे) येथे पोलीस चौकीसमोरच असलेल्या मॉलचे शटर तोडून, तसेच अन्य २२ दुकानांत चोरी !

एवढ्या चोर्‍या होईपर्यंत पोलीस झोपले होते का ? पोलीस चौकीसमोरच चोरी करण्याचे चोरांचे धाडस होत आहे, याचा अर्थ पोलिसांचा धाक न्यून झाला आहे, असा होत नाही का ?

मुंबईत ६५ सहस्रांहून अधिक अर्जांमध्ये त्रुटी !

महिला आणि बालकल्याण विभागाच्या एका अधिकार्‍याने ही माहिती दिली. ज्यांच्या अर्जात त्रुटी असतील, त्यांनी पुन्हा त्या त्रुटींची पूर्तता करून अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अंबरनाथ येथे वृद्धाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

समाजात नैतिकता उरली नसल्याचे दर्शवणारी घटना ! अशा वासनांधांना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

नंदीग्राम एक्सप्रेसच्या शौचालयात प्रवाशाची आत्महत्या !

मृत साबळे यांची पत्नी सुनीता हिने सांगितले की, साबळे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याने मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. एका महिलेला पाहून अश्लील चाळे केल्याचा साबळे यांच्यावर आरोप करण्यात आला होता.

बीड येथील ‘ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थे’च्या कार्यालयांवर ‘ईडी’च्या धाडी !

‘ईडी’ने पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे आणि इतर संचालक यांच्या विरोधात गुन्हे नोंद केले आहेत. आजपर्यंत नोंदवलेल्या गुन्ह्यांनुसार पतसंस्थेने गुंतवणूकदारांची १६८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे.

बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या निषेधार्थ १६ ऑगस्टला इचलकरंजी (कोल्हापूर) बंद !

भारताच्या विरोधात विद्रोह घडवण्याचे काम करणार्‍या व्यक्ती-संघटना यांच्या विरोधात ‘सकल हिंदु समाज इचलकरंजी’ यांच्या वतीने १६ ऑगस्ट या दिवशी ‘इचलकरंजी बंद’चे आवाहन करण्यात आले आहे.

अध्यात्मशास्त्राने विज्ञानातील संशोधनाला मान्यता दिली पाहिजे !

‘सत्य असते, तेच चिरंतन रहाते. धर्मशास्त्रातील सिद्धांत युगानुयुगे तसेच आहेत. त्यांत कोणी पालट करू शकलेला नाही. याउलट विज्ञानातील सिद्धांत काही वर्षांतच पालटतात; कारण विज्ञान अंतिम सत्य सांगू शकत नाही. असे विज्ञान अध्यात्मापेक्षा श्रेष्ठ मानणे, यापेक्षा अज्ञानाचे दुसरे मोठे उदाहरण नसेल.

येरवडा (पुणे) येथील तारकेश्वर मंदिरातील दानपेट्या फोडणार्‍यांना अटक !

मंदिरात चोर्‍या होणारच नाहीत, एवढा धाक पोलिसांनी निर्माण करणे आवश्यक !

मुंबईतील महाराष्ट्र शासनाच्या ‘इस्माईल युसुफ कॉलेज’ची जागा वक्फ मंडळाची झाल्याचा मुसलमानांचा दावा !

ठिकठिकाणच्या भूमी कह्यात घेणार्‍या वक्फ बोर्डची अरेरावी पूर्णत: नष्ट करण्यासाठी वक्फ कायदा रहित करा !

महाराष्ट्रातील गड-दुर्गांच्या पहाणीसाठी ‘युनेस्को’चे पथक सप्टेंबरमध्ये येणार !

युनेस्कोच्या पथकाच्या अहवालानंतर या गड-दुर्गांचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये करण्याची पुढची प्रक्रिया चालू होणार आहे.
भारतातील ४२ आणि त्यांत महाराष्ट्रातील ६ ठिकाणांचा समावेश युनेस्कोच्या या सूचीत आहे.