कोपरगावात (अहिल्यानगर) आढळले ३ मृतदेह, उष्माघाताने ३ मृत्यू झाल्याची शक्यता !

कोपरगाव (जिल्हा अहिल्यानगर) – उष्णतेच्या लाटेने राज्यात होरपळ चालूच असून सध्या राज्यात उन्हाचा तडाखा वाढतांना दिसत आहे. कोपरगाव शहरात काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ वेगवेगळ्या ठिकाणी ३ अनोळखी व्यक्तींचे मृतदेह आढळून आले असून उष्माघाताने २४ घंट्यांत हे ३  मृत्यू झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या तीनही मृतदेहांचा पोलिसांनी पंचनामा केला आहे. सदर तीनही मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तीनही व्यक्तींचा मृत्यू कोणत्या कारणांनी झाला ? याचे पुढील अन्वेषण शहर पोलीस करत आहेत.