मुंबईत २० बांगलादेशी घुसखोरांना ८ महिन्यांचा कारावास !

बांगलादेशी घुसखोर

मुंबई – मुंबईत रहाणार्‍या २० बांगलादेशी घुसखोरांना किल्ला सत्र न्यायालयाने ८ महिन्यांचा कारावास आणि प्रत्येकी ४ सहस्र रुपये इतका दंड अशी शिक्षा दिली आहे. बोरिवली, नालासोपारा, विरार आणि पुणे येथून या सर्व बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये पोलिसांनी बोरिवली परिसरात ३ बांगलादेशींना अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी नालासोपारा, पुणे आणि विरार येथून अन्य १७ घुसखोरांना पकडले. बोरिवली पोलिसांनी हे बांगलादेशी घुसखोर असल्याचे पुरावे न्यायालयात सादर केले होते.

संपादकीय भूमिका

देशात असे किती घुसखोर आहेत ? याचा पोलिसांनी कसून शोध घ्यावा !