‘हमारे बारह’ हिंदी चित्रपट करमुक्त करा ! – महाराष्ट्र करणी सेना

मुंबई – प्रत्येक धर्मातील वाईट प्रथा, चालीरिती मताच्या राजकारणामुळे सरकार बंद करत नसेल; परंतु चित्रपटाद्वारे त्याविषयी जागृती केली जात असेल, तर असे चित्रपट करमुक्त करावेत, अशी मागणी महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख श्री. अजयसिंह सेंगर यांनी केली आहे. याविषयी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.

हिंदी चित्रपट ‘हमारे बारह’चे निर्माते आणि कलाकार यांना ठार मारण्याच्या, तसेच बलात्कार करण्याच्या धमक्या मिळाल्याने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. ‘हमारे बारह’ हा चित्रपट इस्लाममधील चालीरिती आणि परंपरा यांवर भाष्य करणारा असल्याने या धमक्या मिळाल्याचे सांगितले जात आहे, असेही श्री. अजयसिंह सेंगर यांनी पत्रात नमूद केले आहे.

संपादकीय भूमिका

हा चित्रपट अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत येत नाही का ? याचे उत्तर तथाकथित पुरोगाम्यांनी द्यावे !