जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात ८ दिवसांपासून मृतांचा खच !

५० पैकी १६ मृतदेह बेवारस !

जळगाव – गेल्या ८ दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात विविध कारणांनी मृत पावलेले ५० मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागृहात आणण्यात आले होते. त्यांतील १६ मृतदेह बेवारस असून सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. विविध आजारांनी ग्रस्त, रोगप्रतिकार शक्ती अल्प आणि उन्हाची तीव्रता यांमुळे ५० जण मृत पावले आहेत, अशी गोष्ट शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. या सर्व मृतदेहांवर मंत्री गिरीश महाजन यांच्या जी.एम्. फाउंडेशनच्या माध्यमातून अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्याचसमवेत रस्त्यावर असलेल्या बेवारस नागरिकांसाठी सुरक्षित ठिकाणी निवासव्यवस्था करण्यात येणार आहे.