अंदाजपत्रकामध्ये पुणे शहरातील ‘सिग्नल’ दुरुस्तीसाठी रकमेचे प्रावधानच नाही !

  • पुणे महापालिकेचा सावळागोंधळ

  • वर्गीकरणाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्याचे प्रयत्न !

पुणे – शहरातील ठिकठिकाणचे ‘सिग्नल’ (वाहतूक नियंत्रक दिवे) दुरुस्तीसाठी प्रतिवर्ष अंदाजपत्रकांमध्ये अडीच ते तीन कोटी रुपयांचे प्रावधान केले जाते. नव्याने ‘सिग्नल’ उभारणीसह दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेच्या विद्युत् विभागाकडून २ स्वतंत्र निविदा काढण्यात येतात. चालू वर्षीच्या आर्थिक अंदाजपत्रकाची कार्यवाही चालू झाल्यानंतर निधीचे प्रावधान केले नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर विद्युत् विभागाकडून वर्गीकरणाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्याचे प्रयत्न विद्युत् विभागाकडून होत आहेत. त्याविषयीचे पत्र महापालिका आयुक्त, प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांना देण्यात आले आहे. (अशा चुका कशा होतात ? याला उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक)