‘एस्.टी.’च्या कोल्हापूर विभागाला मे महिन्यात साडेतेवीस कोटी रुपयांचे उत्पन्न !

कोल्हापूर, २६ मे (वार्ता.) – ‘एस्.टी.’च्या कोल्हापूर विभागास उन्हाळी सुटीच्या कालावधीत म्हणजे २४ मे अखेर २३ कोटी ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून ‘एस्.टी.’ने ६६ लाख २१ सहस्र किलोमीटर प्रवास केला आहे. सुटीच्या कालावधीत एस्.टी.ने पुणे, मुंबई, सोलापूर येथे विशेषकरून अधिकच्या फेर्‍या केल्या. खासगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत ‘एस्.टी.’चे दर हे सामान्य प्रवाशांना परवडणारे असल्याने त्यांचा ओढा एस्.टी.कडे अधिक दिसून येतो. ‘एस्.टी.’ने गतवर्षीपेक्षा ३ लाख २५ सहस्र अधिक किलोमीटर प्रवास केला असून ३१ मेअखेर या उत्पन्नात निश्चित वाढ होणार आहे ! कोल्हापूर विभाग राज्यात प्रतिकिलोमीटर उत्पन्नवाढीत महापालिका क्षेत्रात ५व्या क्रमांकावर आहे.

जोतिबा यात्रेत २२ लाख ८८ सहस्र रुपयांचे उत्पन्न !

२१ ते २४ मे या कालावधीत जोतिबा यात्रेसाठी १०६ गाड्यांच्या १ सहस्र ५९१ फेर्‍या केल्या. या फेर्‍यांमधून एस्.टी.ला २२ लाख ८८ सहस्र रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यात भाविकांच्या सोयीसाठी कोल्हापूर शहर बसस्थानक आणि जोतिबा देवस्थान येथे स्वतंत्र कक्षांची निर्मिती करण्यात आली होती. अखंडपणे ही वाहतूक चालू होती, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात आली.