भारतातील घुसखोरांना परत पाठवेपर्यंत त्यांना ठेवण्यासाठी ‘नजरकैद केंद्रा’ची उभारणी होणार !

भारतात घुसून या नागरिकांना पुष्कळ गंभीर गुन्हा केला असल्याने एवढा खर्च करून त्यांची बडदास्त ठेवण्याची आवश्यकता आहे का ?

परळी वैजनाथ येथे धर्मांधाकडून विवाहितेवर बलात्कार, जिवे मारण्याची धमकी !

विवाहित महिलांवर अत्याचार करण्यासही मागेपुढे न पहाणारे उद्दाम धर्मांध कठोर शिक्षेस पात्र आहेत. ‘लव्ह जिहाद सर्वत्र कसा चालू आहे’, यासाठी कुठला वेगळा पुरावा हवा ?

थेऊरच्या (जि. पुणे) लाचखोर मंडल अधिकारी जयश्री कवडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला !

लाचखोरीमध्ये महिलांनीही अग्रेसर असणे दुर्दैवी ! अशा लाचखोर अधिकार्‍यांना कडक शिक्षा होणे आवश्यक आहे !

पुणे येथे पोलीस ठाण्यात २ तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न !

हप्तेखोरीला कंटाळून सामान्य नागरिक आत्महत्येच्या निर्णयापर्यंत येत असतील, तर हे अत्यंत गंभीर आहे. या आरोपात खरोखरीच तथ्य असेल, तर संबंधित दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच, यावर आम्ही आजही ठाम ! – उद्योगमंत्री उदय सामंत

कोकण विभागात भाजपला जागा नसल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर भाजपने दावा केला आहे.

कुलर वापरतांना विद्युत् सुरक्षेविषयी काळजी घ्या ! – महावितरणचे आवाहन

कुलर वापरत असतांना ओल्या हाताने तो चालू वा बंद करणे, त्यास स्पर्श करणे कटाक्षाने टाळावे. कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी वीजपुरवठा बंद करावा. कुलरच्या पंख्यासमोर जाळी लावलेली असावी.

रत्नागिरी जिल्ह्यात १८ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश !

जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. 

शिवलिंगाचे जतन आणि संरक्षण शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी उपाययोजना काढा !

त्र्यंबकेश्‍वर येथील मंदिरातील शिवपिंडीचा वज्रलेप निखळला आहे. या प्रकरणी विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोेर्‍हे यांनी ‘त्र्यंबकेश्‍वर देवस्थान ट्रस्ट’च्या अध्यक्षांना तातडीचे पत्र पाठवून ‘शिवलिंगाचे जतन आणि संरक्षण शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना काढावी.

महाराष्ट्रातील अनेक रेल्वेस्थानकांवरील धातूशोधक आणि ‘बॅग स्कॅनर’ यंत्र बंद 

सध्या लोकसभेची निवडणूक घोषित झाली आहे. त्यामुळे मद्याची तस्करी, पैशांची उलाढाल पकडण्यासाठी असे ‘स्कॅनर’ रेल्वेस्थानकांवर असणे अत्यावश्यक आहे; मात्र ‘स्कॅनर’ बंद असल्याने अशी तपासणी होत नाही.

धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी हिंदुत्वनिष्ठ आमदारांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी !

मुसलमान नेत्यांकडून चिथावणीखोर विधाने केली जातात. याविरोधात याचिका प्रविष्ट करण्याची मागणी अल्पसंख्य समाजाकडून केली जात नाही, हे लक्षात घ्या !