समाविष्ट गावांमधील थकबाकीची वसुली थांबवण्याचा पालकमंत्री अजित पवार यांचा आदेश !

समाविष्ट गावांमधील नागरिकांकडून तिप्पट मिळकतकर आकारला जात आहे, तसेच थकबाकी ही सक्तीने वसूल केली जात आहे.

नागपूर येथे ‘बर्ड फ्ल्यू’मुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू !

आजारी कोंबड्यांचे नमुने पुणे आणि नंतर भोपाळमधील उच्च सुरक्षा प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यानंतर ४ मार्च या दिवशी आलेल्या अहवालात कोंबड्यांना ‘बर्ड फ्ल्यू’ची म्हणजेच ‘एवियन इन्फ्लूएंझा’ची लागण झाल्याचे सिद्ध झाले.

अहिल्यानगर येथे सराफ व्यावसायिकाची ३२ सहस्र ४०० रुपयांची फसवणूक !

पोलिसांचा धाक संपल्याने असे गुन्हे करण्यास गुन्हेगार धजावतात.

संत गजानन महाराज प्रकटदिनाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे येथे विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शन आणि अध्यात्मप्रसार !

संत गजानन महाराज प्रकटदिनाच्या निमित्ताने ३ मार्च या दिवशी पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सात्त्विक उत्पादने, तसेच शास्त्रोक्त माहिती असलेल्या ग्रंथांचे पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी कक्ष लावण्यात आले होते.

हिंदुत्वावरून उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी खात्रीने एकत्र येतील ! – आमदार शहाजी बापू पाटील, शिवसेना

माझे अनुमान चुकणार नाही. हिंदुत्वाच्या सूत्रावरून उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी खात्रीने एकत्र येतील, असा विश्वास शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केला आहे.

पिंपरी (पुणे) येथे ‘मॅफेड्रोन’प्रकरणी अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाकडून अनेक गुन्हे उघडकीस !

देशातील सर्वच अमली पदार्थांचा व्यापार संपवण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : लोकलमधून पडून महिला पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू !; पत्नीला विलंब झाल्याने पतीकडून विमानात बाँब ठेवल्याची अफवा !…

लोकलने प्रवास करणार्‍या महिला पोलीस कर्मचारी अश्विनी डोमडे (वय २७) यांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. नाहूर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ही घडली आहे.

दुकानांवरील पाट्या मराठीत न लावणार्‍या दुकानदारांना नगर परिषद प्रशासनाकडून कारवाई करण्याची चेतावणी

आता केवळ सूचना, चेतावणी आणि कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रशासनाने कायदेशीर कारवाई करून मराठीची गळचेपी थांबवावी, ही मराठीप्रेमींची अपेक्षा !

‘वन्दे  भारत’ मंगळुरूपर्यंत चालवण्यास आमचा विरोध ! – जयवंत दरेकर, कोकण विकास समितीचे अध्यक्ष

वन्दे भारत एक्सप्रेसच्या प्रस्तावित एकत्रिकरणास ठाम विरोध असून या सेवेचा  मंगळुरूपर्यंत विस्तार केल्यास मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा विभागातील प्रवाशांची गैरसोय होणार आहे.