- सहआरोपीकडून अटक न करण्यासाठी साडेतीन लाख रुपये घेतले !
- गाडीतून आणखी २ किलो ४०० ग्रॅम ‘मॅफेड्रोन’ जप्त !
पिंपरी (पुणे) – ‘मॅफेड्रोन’ अमली पदार्थ विक्री प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेल्या निगडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याने पूर्वी केलेले गुन्हे उघडकीस येऊ लागले आहेत. एका गुन्ह्यामध्ये सहआरोपीला अटक न करण्यासाठी शेळके याने ३ लाख ५० सहस्र रुपये घेतल्याचे उघडकीस आले आहे. (स्वत:च अमली पदार्थांची विक्री आणि इतर गुन्हे करणार्या पोलीस उपनिरीक्षकावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे ! – संपादक) एका आस्थापनातील लेखा व्यवस्थापक आणि लेखापाल यांनी आर्थिक अपहार केल्याप्रकरणी आस्थापनाने त्यांच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये फौजदारी अर्ज प्रविष्ट केला होता. त्याचे अन्वेषण करण्याचे दायित्व शेळके यांच्याकडे आले. या गुन्ह्यांमध्ये सहआरोपीचा सहभाग आहे कि नाही, हे न पहाता त्याला अटक न करण्यासाठी त्याच्याकडून ३ लाख ५० सहस्र रुपये घेतले. याविषयी संबंधित आरोपीने तक्रार प्रविष्ट केली होती. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी अन्वेषण केले असता तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे समोर आले आहे.
आरोपी शेळके यांची अधिक चौकशी करून, पोलिसांनी त्यांच्या चारचाकी गाडीमधून आणखी २ किलो ४०० ग्रॅम ‘मॅफेड्रोन’ हस्तगत केले आहेत. या गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत ४७ किलो १९० ग्रॅम ‘मॅफेड्रोन’ जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी दिली.
संपादकीय भूमिका :
|