सात्त्विक उत्पादने, तसेच शास्त्रोक्त माहिती असलेल्या कक्षाला मान्यवरांच्या भेटी !
पुणे – संत गजानन महाराज प्रकटदिनाच्या निमित्ताने ३ मार्च या दिवशी पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सात्त्विक उत्पादने, तसेच शास्त्रोक्त माहिती असलेल्या ग्रंथांचे पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी कक्ष लावण्यात आले होते. सात्त्विक उत्पादने असलेल्या कक्षास भाविक-जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच विविध मान्यवरांनी भेटी दिल्या.
या वेळी माजी महापौर तथा भाजपचे सरचिटणीस श्री. मुरलीधर मोहोळ आणि भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा तथा खासदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी कक्षाला भेट दिली आणि ग्रंथांविषयी माहिती जाणून घेतली. प्रदर्शन कक्ष उभारण्यात आणि ग्रंथांचा प्रसार करण्यात धर्मप्रेमी अन् जिज्ञासू यांचा सक्रीय सहभाग होता.