नवी मुंबई – उरण तालुक्यातील चिर्ले गावचे भूमीपुत्र आणि रायगड जिल्ह्याचे भाजपचे उपाध्यक्ष निळकंठ घरत (वय ५२ वर्षे) यांचे २ फेब्रुवारीला निधन झाले. शोभीवंत फुग्यामध्ये हवा भरत असतांना त्याचा स्फोट होऊन घरत घायाळ झाले होते. यात ते ६० ते ७० टक्के भाजले. त्यांच्यावर ऐरोली येथील बर्न रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चिर्ले येथील स्मशानभूमीत शोकाकुलल वातावरणात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आणि घरत परिवार आहे.