
कोल्हापूर, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील १ सहस्र ३५० श्रीरामभक्तांना भाजपच्या वतीने पहिल्या टप्प्यात अयोध्या दर्शन घडवण्यात येणार आहे. १३ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत श्रीरामभक्तांना कोल्हापूर-अयोध्या-कोल्हापूर या विशेष रेल्वेद्वारे ही विशेष सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. कोल्हापूर येथून निघणार्या या विशेष रेल्वेसाठी भाजप सरचिटणीस डॉ. सदानंद राजवर्धन – ९८२३४२३७९४ यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती भाजप खासदार श्री. धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी माजी आमदार अमल महाडिक यांसह अन्य उपस्थित होते.
श्री. धनंजय महाडिक पुढे म्हणाले, ‘‘या रेल्वे प्रवासामध्ये रहाणे आणि भोजनाची सर्व व्यवस्था भाजपच्या माध्यमातून केली जाणार आहे. या संपूर्ण प्रवासाचा व्यय २ सहस्र रुपये असून श्रीरामभक्तांना तो केवळ १ सहस्र रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे. ५ फेब्रुवारीपर्यंत नोंदणीसाठी भाजप स्थानिक मंडल अध्यक्ष यांच्याकडे श्रीरामभक्तांनी त्यांची नोंदणी करावी. या विशेष रेल्वेत दोन बोगी या महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. पहिली रेल्वे जाऊन आल्यावर आगामी कालावधीत कोल्हापूर ते अयोध्या अशा अनेक रेल्वे फेर्या आयोजित करण्यात येणार आहे.’’
ज्ञानातून सत्याचा धर्म आणि खर्याचा रस्ता दाखवा ! – डॉ. विवेक बेल्हेकर
प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी ! – नितीन फळदेसाई, आंतरराष्ट्रीय बजरंग दल, गोवा अध्यक्ष
बांदोडाच्या ग्रामसभेत फर्मागुडी येथील ‘आय.आय.टी.’ला विरोध
‘एकादश तीर्थयात्रा’ योजना राबवल्याबद्दल गोमंतक मंदिर महासंघाकडून गोवा सरकारचे अभिनंदन !
कळसा-भंडुरा प्रकल्पांसाठी कर्नाटक सर्वाेच्च न्यायालयात जाणार
म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा