आज लातूर येथे ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ !

लातूर, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – येथे ५ फेब्रुवारी या दिवशी सकल हिंदू समाजाच्या वतीने ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. गोलाई येथील श्री जगदंबादेवी मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत हा मोर्चा होणार आहे. वलांडी (जिल्हा लातूर) येथील ६ वर्षांच्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करणार्‍या धर्मांधाला कठोर शिक्षा व्हावी, अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथील हिंदु युवकावर अमानुष आक्रमण करणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा व्हावी, ‘जय श्रीराम’ची घोषणा दिल्याच्या कारणावरून कोल्हापूर येथील शालेय बसवर दगडफेक करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई व्हावी, या आणि अन्य घटनांच्या निषेधार्थ या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.