दादर-पंढरपूर एक्सप्रेस मिरज-सांगलीमार्गे सातार्‍यापर्यंत धावणार !

प्रतिकात्मक चित्र

पंढरपूर – प्रतिदिन दादर येथून सकाळी ६.३५ वाजता निघून रात्री ९.४० वाजता पंढरपूर येथे पोचणारी ‘दादर-पंढरपूर’ एक्सप्रेस आता मिरज-सांगलीमार्गे सातार्‍यापर्यंत धावणार आहे. ही गाडी रविवार, सोमवार आणि शुक्रवार अशी ३ दिवस आहे. ही गाडी पंढरपूर येथून निघून सांगोला, ढालगाव, जत रोड, कवठेमहांकाळ, मिरज, सांगली, भिलवडी, किर्लाेस्करवाडी, ताकारी, कराड, मसूर, कोरेगाव आणि सातारा अशी स्थानके घेईल. परतीच्या प्रवासातही ती सातारा, मिरज, पंढरपूर, दादर अशी धावेल. (सोमवार, मंगळवार, शनिवार) यामुळे सातारा येथून पंढरपूर येथे जाणार्‍या भाविकांना चांगली सोय उपलब्ध होणार आहे.