ठाणे, २५ जानेवारी (वार्ता.) – मुंबई आणि डोंबिवली परिसर यांतील जैन मंदिरांमध्ये सोवळ्यात दर्शन घेण्याच्या निमित्ताने जाऊन देव्हार्यातील धार्मिक विधीसाठी लागणारा चांदीचा ऐवज चोरणारा सराईत चोरटा नरेश अगरचंद जैन (वय ४७ वर्षे) याला गिरगाव येथील खेतवाडी भागातून अटक केली आहे.
मुंबईत विविध ९ पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर जैन मंदिरात चोरी केल्याचे गुन्हे नोंद आहेत. या प्रकरणी पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत. (कायद्याचे भय वाटत नसल्यामुळे गुन्हेगार गुन्हे करण्याचे धाडस करत आहेत. – संपादक)