नागपूर – केंद्र सरकारने लागू केलेल्या कायद्याच्या विरोधात ट्रक आणि टँकर चालकांनी पुकारलेल्या संपानंतर ३ जानेवारीपासून स्कूल बस आणि स्कूल व्हॅन चालकांनीही एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारला. याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसला असून सकाळपासून आपल्या पाल्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी पालकांना धावपळ करावी लागली. संपामध्ये ३ सहस्रांहून अधिक स्कूलबस आणि ७०० हून अधिक स्कूल व्हॅनचालक सहभागी झाले आहेत.