चुनाभट्टी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा नोंद

मुंबई – वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या चुनाभट्टी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तोडफोड केल्यावरून कराड येथील मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठानचे सरचिटणीस अभिजित मोकाशी आणि उपाध्यक्ष विश्वजित मोकाशी यांच्यावर वडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

या विद्यापिठावर २६ ॲागस्ट २०२३ या दिवशी ४० ते ५० जणांनी आक्रमण केले होते. या वेळी प्रा. रणजित मोरे यांना मारहाण करण्यात आली. महाविद्यालयाच्या स्वागतकक्षातून चाव्या घेऊन कार्यालयाचे कुलूप तोडून जमाव आतमध्ये शिरला आणि सीसीटीव्ही, डीव्हिआर् आदींची तोडफोड केली. पोलीस महाविद्यालयात पोचल्याने पुढील अनर्थ टळला.