पुणे येथे सवाई गंधर्व महोत्सवात आग

पुणे – येथे चालू असलेल्या सवाई गंधर्व महोत्सवात १७ डिसेंबर या दिवशी आगीची घटना घडली आहे. कार्यक्रमाच्या मंडपाच्या मागील बाजूस ‘फोटोगॅलरी’ असलेल्या ठिकाणी ‘शॉर्ट सर्किट’मुळे आग लागली आहे. कार्यक्रम चालू असतांना आग लागल्याने कार्यक्रमात प्रेक्षकांची तारांबळ उडाली होती. १७ डिसेंबर हा महोत्सवाचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. मागे बसलेल्या प्रेक्षकांनी मंडपाच्या बाहेर धाव घेतली. पं. सुहास व्यास यांच्या गायनाचा कार्यक्रम संपला होता. या वेळी ही आग लागल्याची माहिती आहे; मात्र फार मोठी आग नसल्याने आगीवर लवकर नियंत्रण मिळवून कार्यक्रम पुन्हा चालू करण्यात आला.