४ आणि ५ नोव्हेंबरला ‘प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज प्रबोधिनी’च्या वतीने दत्त सांप्रदायिक स्नेहमेळाव्याचे आयोजन ! 

४ आणि ५ नोव्हेंबरला सकाळी ९ ते दुपारी १, दुपारी ३ ते सायंकाळी ६ अशा दोन सत्रांत विविध व्याख्याने, कीर्तन, चर्चासत्रे होतील. संस्थेच्या वतीने ‘श्री अनघदत्त संदेश’ या पत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित होत आहे.’’

ठाणे जिल्ह्याधिकार्‍यांच्या नावे बनावट आदेश काढल्याप्रकरणी गुन्हा नोंद !

बनावट आदेश काढणार्‍याला शोधून त्याच्यावर कठोर कारवाईच करायला हवी !

नवरात्रीविषयी आक्षेपार्ह कार्यक्रम घेतल्याप्रकरणी मुख्याध्यापिकेला नोटीस ! – विजयकुमार म्हसाळ, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका

तक्रार मिळून १० दिवस होऊनही पोलीस किंवा महापालिका प्रशासन यांनी कारवाई केली नाही. त्यामुळे हिंदू संतप्त आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात भिंतीवर पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात लिहिले आक्षेपार्ह लिखाण !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील भिंतीवर असे लिहिले जाते, यावरून येथे विद्यार्थ्यांना काय शिकवले जात आहे ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : सोन्याच्या साखळीची चोरी !; जगभरातील आलिशान घरांच्या सूचीत मुंबई चौथ्या क्रमांकावर… सार्वजनिक शौचालय उपलब्ध नाही… रसायनांच्या आस्थापनात भीषण आग… उपोषण मागे घेतल्याविषयी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांचे आभार…

सकाळी चालण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीला पोलीस असल्याचे भासवून दोघांनी गळ्यातील सोन्याची साखळी चोरली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

इंस्टाग्रामद्वारे ओळख वाढवून युवतीवर बलात्कार !

इंस्टाग्राम खात्याद्वारे ओळख झालेल्या अल्पवयीन युवतीला एका तरुणाने विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात विशाल बाळकृष्ण अवघडे (वय ३५ वर्षे) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.

श्री तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी दर्शन पासमध्ये सावळा गोंधळ !

श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये व्हीआयपी (अतीमहनीय व्यक्ती) दर्शन पासमध्ये सावळा गोंधळ चालू असल्याची चर्चा सामाजिक माध्यमांत होत आहे. व्हीआयपी रजिस्टरमधील नोंदी आणि प्रत्यक्षात सीसीटीव्ही चित्रण यांमध्ये तफावत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ४५ प्रांतांचे पदाधिकारी भाजपच्या प्रचाराची दिशा आखणार !

लोकसभा आणि ५ राज्यांतील विधानसभा प्रचाराची दिशा ठरवण्यासाठी देशाच्या ४५ प्रांतांतील वरिष्ठ पदाधिकारी गुजरात राज्यातील भूज शहरात ३ दिवसांसाठी एकत्र येत आहेत.

आमदार रवींद्र वायकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता. वायकर यांनी मुंबई येथील जोगेश्वरी येथील महापालिकेच्या राखीव भूखंडावर १ पंचतारांकित उपाहारगृह बांधल्यासंबंधीची तक्रार होती.

संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्याने ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’च्या कार्यकर्त्यांसह दीड सहस्र जणांवर गुन्हे नोंद !

बेळगाव पोलिसांनी अनुमती नाकारलेली असतांनाही १ नोव्हेंबरला निषेधफेरी काढणे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्याविषयी ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’चे १८ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दीड सहस्र मराठी भाषिक यांवर मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.