भूज येथे राष्ट्रीय मंडळाची ५ नोव्हेंबरपासून बैठक !

नागपूर – लोकसभा आणि ५ राज्यांतील विधानसभा प्रचाराची दिशा ठरवण्यासाठी देशाच्या ४५ प्रांतांतील वरिष्ठ पदाधिकारी गुजरात राज्यातील भूज शहरात ३ दिवसांसाठी एकत्र येत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत भूज येथे होईल. २२ जानेवारी या दिवशी अयोध्या येथील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यासह सरसंघचालकांच्या ‘दसरा उत्सव’ भाषणातील सूत्रांच्या कार्यवाहीवर चर्चा होणार आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ही माहिती दिली. प्रत्येक निवडणुकीत भाजपसमोरील अडचणी दूर करण्यासाठी संघाचे कार्यकर्ते सक्रीय होतात. प्रचाराची दिशा, तसेच अन्य सूत्रे वरिष्ठ स्तरावर ठरतात. ‘दसरा महोत्सवा’त प.पू. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणांतील सूत्रांच्या आधारावरच ही बैठक होणार आहे.
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court