मुंबई – मराठ्यांना ‘कुणबी’ म्हणून प्रमाणपत्र देण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींना त्याप्रमाणे जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धत निश्चित करण्यासाठी राज्यशासनाकडून निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. याविषयी राज्यातील स्थिती जाणून घेण्यासाठी ही समिती २२ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यांचा दौरा करून माहिती घेणार आहे.