लाच घेतांना नायब तहसीलदार कह्यात !

नायब तहसीलदार सुनील चव्‍हाण यांच्‍यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत कह्यात घेतले.

कडेगाव (जिल्‍हा सांगली) – भूमीची अकृषक आकारणी करून गुंठेवारी नियमानुकूल आदेश देण्‍यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार सुनील चव्‍हाण यांच्‍यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत कह्यात घेतले. चव्‍हाण यांच्‍या विरोधात कडेगाव पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. (भ्रष्‍टाचारग्रस्‍त महाराष्‍ट ! – संपादक)

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी, तसेच अन्‍य पोलीस अधिकारी यांच्‍या पथकाने केली.