मिरज – ‘भारतीय जनता पक्ष ओबीसी सेल’च्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या माजी महापौर सौ. संगीता विठ्ठलतात्या खोत यांनी इंदिरानगर येथील कुष्ठरोगी वसाहतीत, तसेच मेंढपाळांच्या समवेत दीपावली साजरी केली. या संदर्भात सौ. संगीता खोत म्हणाल्या, ‘‘समाजापासून पूर्णपणे वंचित असणारा घटक, तसेच मेंढपाळ हा ऊन-वारा-पाऊस यांची तमा न बाळगता मेंढरे चरत गावोगावी भटकतो. त्यामुळे त्यांना कपडे देऊन त्यांच्यासमवेत दीपावली साजरी केल्यावर त्यांच्या चेहर्यावरील आनंद बरेच काही सांगून गेला.’’ या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, सुनील वाघमोडे, अमर पडळकर, दादासाहेब सरगर, दयानंद खोत, विठ्ठलतात्या खोत, अनिरुद्ध गडदे, भीमा कुंभार यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.