थिरुवनंतपूरम् (केरळ) – नरेंद्र मोदी सरकारमधील कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातील ५७ वर्षीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी नुकतीच शबरीमला मंदिरात जाऊन भगवान अय्यप्पांचे दर्शन घेतले. मंदिरात प्रवेश करतांना मंदिराच्या नियमानुसार त्या काळे कपडे घालून अनवाणी मंदिरात गेल्या आणि भगवान अय्यप्पांचे दर्शन घेतले.
वर्ष २०१८ मध्ये जेव्हा सर्व वयोगटातील महिलांच्या शबरीमला मंदिरात प्रवेशाविषयी सर्वाेच्च न्यायालयात खटला चालू होता, तेव्हा शोभा करंदलाजे यांनी मंदिराच्या प्रथेमध्ये पालट करण्यास विरोध करणार्या महिलांना पाठिंबा दिला होता. ‘शबरीमला हा हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे, त्यामुळे ती परंपरा पाळली पाहिजे’, असे त्यांचे मत होते.
मंदिराची महिलांच्या संदर्भातील परंपरा !
वर्ष १० ते ५० वयोगटातील मुली आणि महिला यांना परंपरेने शबरीमलामध्ये प्रवेश करण्यास मनाई आहे. या वयोमर्यादेखालील आणि त्यावरील महिला मंदिराला भेट देऊ शकतात. शोभा करंदलाजे या ५७ वर्षांच्या आहेत.