विधीमंडळांचे हिवाळी अधिवेशन केवळ १० दिवस असण्याची शक्यता !
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे तात्पुरते वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार हे अधिवेशन ७ ते २० डिसेंबर या कालावधीत येथे होईल. प्रतिवर्षी हे अधिवेशन शुक्रवारी संपते; पण यंदा ते बुधवारी म्हणजे २० डिसेंबर या दिवशी संपणार असल्यामुळे अधिवेशन अवघ्या १० दिवसांचे असण्याची शक्यता आहे.
Goa : कवळे येथील प्रसिद्ध श्री शांतादुर्गा मंदिरातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली भेट !
कवळे येथील श्री शांतादुर्गा मंदिरातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांची भेट दिली.
‘पतंजली योगपीठ हरिद्वार’कडून अमरावती येथील रणरागिणी शाखेच्या सौ. अनुभूती टवलारे यांचा सत्कार !
पतंजली योगपीठ, हरिद्वार यांच्याकडून अमरावती येथे नुकतेच प्रांतीय महिला महासंमेलन घेण्यात आले. त्यामध्ये पू. आचार्या डॉ. साध्वी देवप्रियाजी यांनी महिलांनी आयुष्यात विविध भूमिका पार पाडत असतांना आदर्श कसे रहावे ? याविषयी इतिहासातील उदाहरणे देऊन उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले
आपल्याला देवीचे भक्त होऊन आर्ततेने आशीर्वाद मागावा लागेल ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी
श्री दुर्गामातेच्या चरणी आपण जे येतो ते व्यक्तीगत उत्कर्षासाठी काही मागणे मागण्यासाठी नाही, तर भारतमातेचा उद्ध्वस्त झालेला संसार दुरुस्त करण्याची शक्ती या देशाला यावी, यासाठी माझे आयुष्य पणाला लावून काम करण्याची इच्छा आहे.
देवद गाव येथे श्री दुर्गामाता दौड पार पडली !
दौडीमध्ये ‘पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो !’, ‘श्री दुर्गादेवीचा विजय असो’, असे विविध वीरश्रीयुक्त जयघोष करण्यात आले.
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची सप्तमातृकाशक्ती श्रीदेवी मातेच्या रूपातील पूजा !
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची सप्तमीला सप्तमातृकाशक्ती श्रीदेवी मातेच्या रूपातील पूजा बांधण्यात आली होती.
टोलवसुली कि टोलधाड ?
पूर्वीच्या काळी वाटसरूंना जंगलात अडवून दरोडेखोर त्यांच्याकडील साहित्याची लूटमार करायचे. ‘जंगलात आडवाटेला चालणारी ही वाटमारी सद्यःस्थितीत शहरांतील रस्त्यांवर उघडपणे चालू आहे का ?’, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटायला नको.
साटेली गावातील पाणीपुरवठा ६ दिवसांनंतर चालू नागरिकांचे पाण्याअभावी झाले हाल !
ठेकेदार आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे समस्या निर्माण झाल्याचा आरोप
गोहत्या करणार्यांच्या पाठीशी असणारा हिंदुद्वेषी कम्युनिस्ट पक्ष !
‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’च्या महिला शाखेने सर्वाेच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून गोरक्षकांकडून गोमांसाची वाहतूक करणार्या मुसलमानांवर आक्रमण होत असल्याचा दावा केला आहे. यावरून सर्वाेच्च न्यायालयाने सर्व राज्यांना नोटीस पाठवली आहे.