
अमरावती – पतंजली योगपीठ, हरिद्वार यांच्याकडून अमरावती येथे नुकतेच प्रांतीय महिला महासंमेलन घेण्यात आले. त्यामध्ये पू. आचार्या डॉ. साध्वी देवप्रियाजी यांनी महिलांनी आयुष्यात विविध भूमिका पार पाडत असतांना आदर्श कसे रहावे ? याविषयी इतिहासातील उदाहरणे देऊन उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले, तसेच योग आणि ध्यान करण्याच्या महत्त्वाविषयी सांगितले. या कार्यक्रमात अमरावती येथील विविध क्षेत्रांत समाजासाठी सक्रीयपणे कार्य करणार्या काही महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. अनुभूती टवलारे यांचाही सत्कार पतंजली योगपीठ, हरिद्वार संस्थेच्या वतीने करण्यात आला. या वेळी अपक्ष खासदार सौ. नवनीत राणा उपस्थित होत्या.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !